parag parikh flexi cap fund : देशातील सर्वात मोठ्या फ्लेक्सी कॅप फंड 'पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड'ने (PPFCF) ने एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. आयटीसी हॉटेल्सचे ९८.९९ लाख रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर, त्याच कालावधीत ८ कंपन्यांमधील त्यांचा हिस्सा वाढवला आहे. पीपीएफसीएफ म्युच्युअल फंडने एप्रिलमध्ये कोल इंडियामध्ये सर्वात मोठी खरेदी केली, फंड हाऊसने ७२.४९ लाख रुपयांचे नवीन शेअर्स खरेदी केले. ज्यामुळे एकूण हिस्सा १४.८३ कोटी शेअर्सवर पोहोचला. त्याच वेळी, फंड हाऊसने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आयटीसीचे ४०.७६ लाख नवीन शेअर्स देखील जोडले आहेत.
पीपीएफसीएफने झायडस लाईफसायन्सेसमधील आपला हिस्सा वाढवला आहे, ९.३२ लाख शेअर्स खरेदी केल्यानंतर, कंपनीतील या फंडाचा एकूण हिस्सा १.३९ कोटी शेअर्सपर्यंत वाढला आहे. याशिवाय, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने ८.५१ लाख शेअर्स, महिंद्रा अँड महिंद्रा ६.४० लाख शेअर्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज २.७० लाख शेअर्स, ईआयडी पॅरी इंडियाचे १.४४ लाख शेअर्स आणि मारुती सुझुकी इंडियाचे ३,५९२ शेअर्समध्ये हिस्सेदारी वाढवली आहे.
पोर्टफोलिओमध्ये किती बदल?
या कालावधीत, फंडाने पोर्टफोलिओमधून मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे २३.२७ लाख शेअर्स आणि आयपीसीए लॅबोरेटरीजचे ६९,७७१ शेअर्स कमी केले आहेत. तर HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, HCL टेक्नॉलॉजीज, सिप्ला, CDSL, IEX आणि इतर १६ समभागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एप्रिलमध्ये फंडाने कोणतेही नवीन स्टॉक खरेदी केलेले नाहीत. मार्चमध्ये, या फंडाची गुंतवणूक २७ स्टॉकमध्ये होती, जी एप्रिलमध्ये २६ स्टॉकवर कमी झाली.
वाचा - पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाची सुरुवात
२४ मे २०१३ रोजी पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाची सुरुवात करण्यात आला. ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. हा फंड हाउस भारतीय स्टॉकमध्ये ६५% पर्यंत आणि परदेशी स्टॉक किंवा कर्ज बाजार साधनांमध्ये ३५% पर्यंत गुंतवणूक करू शकतो. एप्रिल २०२५ अखेर या निधीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ९८,५४१.२८ कोटी रुपये होती. या कालावधीत, फंडाने रोख, कर्ज आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये २६.३०% गुंतवणूक सुरक्षित ठेवली आहे. फंड हाऊसचे म्हणणे आहे की ते कंपनीची गुणवत्ता, तिचे व्यवसाय मॉडेल आणि तिचे मूल्यांकन यावर आधारित गुंतवणूकीचे निर्णय घेतात.