Lokmat Money >म्युच्युअल फंड > पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास?

पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास?

Mutual Fund Investment : शेअर बाजारात अनेक चढ-उतार होऊनही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:19 IST2025-01-20T09:19:37+5:302025-01-20T09:19:37+5:30

Mutual Fund Investment : शेअर बाजारात अनेक चढ-उतार होऊनही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असतात.

Mutual Fund investors are investing heavily in passive funds what s special about this | पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास?

पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास?

Mutual Fund Investment : शेअर बाजारात अनेक चढ-उतार होऊनही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असतात. सध्या गुंतवणूकदार आता पूर्वीपेक्षा अधिक हुशारीनं गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी ते फंडाची माहिती गोळा करत असतात आणि नंतर पैसे गुंतवत असतात. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड गुंतवणूकदार इंडेक्स फंड आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंडांसह पॅसिव्ह फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे या फंडांच्या फोलिओमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झालीये. त्याचबरोबर असेट अंडर मॅनेजमेंट २४ टक्क्यांहून अधिक वाढून ११ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

२०२४ मध्ये १२२ योजना लाँच

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड हाऊसेसनं २०२४ मध्ये एकूण १२२ नवीन पॅसिव्ह फंड स्कीम्स सुरू केल्या. फंड उद्योगातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाकडे आता पॅसिव्ह फंडांमध्ये १.४६ कोटी फोलिओ आहेत. त्यांचं एयूएम १.६५ लाख कोटी रुपये आहे आणि ईटीएफच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये त्याचा वाटा तब्बल ५५% आहे. कोटक म्युच्युअल फंड, अॅक्सिस आणि मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड यांसारख्या अन्य फंड हाऊसेसनंही पॅसिव्ह फंडांमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे.

पॅसिव्ह फंड म्हणजे काय?

पॅसिव्ह फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स इत्यादी बाजार निर्देशांकांची नक्कल करणाऱ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करते. पॅसिव्ह फंड बेंचमार्क इंडेक्सनुसार आपले पैसे गुंतवतो. त्यामुळे या फंडाचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्याही फंड मॅनेजरची गरज भासत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या पॅसिव्ह फंडाचा बेंचमार्क इंडेक्स निफ्टी ५० असेल तर तो फंड फक्त निफ्टी ५० मध्ये समाविष्ट कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करेल. पॅसिव्ह फंड आपल्या वॅटेजच्या प्रमाणात सेन्सेक्स ३०, निफ्टी ५० मध्ये पैसे गुंतवतात. पॅसिव्ह फंडांमध्ये मॅनेजरची सक्रिय भूमिका नसते.

गुंतवणूकदारांना समजावणं सोपं

निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या ईटीएफच्या प्रमुख करुणा सुंदरेशन म्हणाल्या की, पॅसिव्ह ही एक उत्तम ऑफर आहे. फंड बाजाराच्या विविध भागांना चांगले एक्सपोजर देतात. असे बरेच उत्तम फंड आहेत, जे गुंतवणूकदारांना निवडण्यासाठी खूप भिन्न पोर्टफोलिओ आणि विविध जोखीम-परतावा प्रोफाइल ऑफर करतात. या प्रकारचे फंड निवडण्यात गुंतवणूकदारांचा वाढता रस लक्षात घेता इतर म्युच्युअल फंड कंपन्यांनीही अनेक पॅसिव्ह फंड सुरू केले आहेत. पॅसिव्ह फंडांनी ही गुंतवणूकदारांना आकर्षित केलंय कारण त्यांचं खर्चाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना समजणं सोपं आहे, ज्यामुळे ते किरकोळ आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय बनतात.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाविषयी माहिती देण्यात आली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Mutual Fund investors are investing heavily in passive funds what s special about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.