Lokmat Money >म्युच्युअल फंड > लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्सी आणि व्हॅल्यू फंड; कुठे असते कमी जोखीम? सर्वाधिक रिटर्न कोण देतं?

लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्सी आणि व्हॅल्यू फंड; कुठे असते कमी जोखीम? सर्वाधिक रिटर्न कोण देतं?

Mutual Funds : तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्सी आणि व्हॅल्यू फंड या विषयी माहिती असायला हवी. या सर्व म्युच्युअल फंडांमध्ये काय फरक आहे? कुठे गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आहे? हे आज जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 11:46 IST2025-03-15T11:45:35+5:302025-03-15T11:46:01+5:30

Mutual Funds : तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्सी आणि व्हॅल्यू फंड या विषयी माहिती असायला हवी. या सर्व म्युच्युअल फंडांमध्ये काय फरक आहे? कुठे गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आहे? हे आज जाणून घेऊ.

large mid small flexi and value funds which one has the lowest risk and which one gives the highest returns | लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्सी आणि व्हॅल्यू फंड; कुठे असते कमी जोखीम? सर्वाधिक रिटर्न कोण देतं?

लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्सी आणि व्हॅल्यू फंड; कुठे असते कमी जोखीम? सर्वाधिक रिटर्न कोण देतं?

Mutual Funds : तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कारण, आकर्षक जाहिरातीच्या नादात अनेकजण आपल्या आयुष्यभराची कमाई गमावून बसले आहेत. तुम्हाला सुरुवातीला स्टॉक समजून घेणे थोडे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही प्रथम म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणता? कुठे कमी जोखीम आहे? वास्तविक, म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत - जसे की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि इतर म्युच्युअल फंड. अशा परिस्थितीत, नवीन गुंतवणूकदाराचा गोंधळ होऊ शकतो. आपण या सर्व फंडांची माहिती घेऊयात.

लार्ज कॅप फंड म्हणजे काय?
नावाप्रमाणेच हा फंडात मोठं भांडवल असलेल्या कंपन्यांचा समावेश असतो. देशातील टॉप १०० कंपन्या लार्ज कॅप प्रकारात मोडतात, ज्यांचे मार्केट कॅप सर्वाधिक आहे. लार्ज कॅप फंडांना ब्लू-चिप स्टॉक देखील म्हणतात. लार्ज कॅपमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे सर्वोच्च १०० कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे आहे. बाजारातील चढउताराचा परिणाम या फंडांवर इतर फंडांच्या तुलनेत कमी होतो. या फंडाची वाढही संतुलित असते. मार्केट करेक्शन दरम्यान यामध्ये फारशी अस्थिरता दिसून येत नाही. म्हणूनच तज्ञ नवीन गुंतवणूकदारांना लार्ज कॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

मिड कॅप फंड म्हणजे काय?
मिड कॅप फंडांमध्ये ज्यां कंपन्यांचे मार्केट कॅपच्या आधारे रँकिंग १०१ ते २५० पर्यंत असते. या कंपन्या बाजारात मिड कॅप फंडांमध्ये स्थान दिले जाते. या फंडांमध्येही गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. या फंडातील गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पण मिड कॅप फंड हा लार्ज कॅप पेक्षा जास्त जोखीम आणि स्मॉल कॅप पेक्षा कमी जोखमीचा असतो. म्हणून मिड कॅप हा फंडाला जोखीम आणि परतावा यामध्ये संतुलित मानला जातो. मिड कॅप कंपन्यांमध्ये भविष्यात लार्ज कॅप कंपन्या बनण्याची क्षमता असते.

स्मॉल कॅप फंड म्हणजे काय?
ज्या कंपन्यांचे रँकिंग २५० च्या वर आहे, त्यांना स्मॉल कॅपमध्ये ठेवले जाते. या कंपन्यांची मिड कॅप फंडात जाण्याची शक्यता खूप जास्त असते. या कंपन्यांचा वाढीचा दरही खूप जास्त आहे. पण या कंपन्या बाजारातील चढउतारांवरही खूप लवकर प्रतिक्रिया देतात, त्यामुळे त्यांच्यात अधिक अस्थिरता असते. त्यात गुंतवणूक करणे थोडे धोक्याचे असते. ज्या लोकांना जास्त जोखीम घेऊन पैसे कमवायचे आहेत ते या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

फ्लेक्सी फंड म्हणजे काय?
कमी जोखीम आणि चांगल्या परताव्यासाठी ओळखला जाणारा, फ्लेक्सी फंड हा ओपन एंडेड फंड आहे. या फंडात, फंड व्यवस्थापकाला कोणत्या श्रेणीत किती गुंतवणूक करावी याचे सातंत्र्य असते. या फंडाद्वारे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकतात. यामध्ये निधी व्यवस्थापक गरजेनुसार गुंतवणूकदारांचे पैसे लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये गुंतवतो. या फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाजाराची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. गुंतवणूकदार तज्ञांच्या मदतीने यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

व्हॅल्यू फंड म्हणजे काय?
व्हॅल्यू फंड असे फंड आहेत ज्यांचे सध्याचे मूल्यांकन त्यांच्या वाजवी मूल्यापेक्षा कमी आहे. बाजारातील परिस्थिती किंवा कोणत्याही नकारात्मक भावनांमुळे अशा समभागांची किंमत बदलते. परंतु, या फंडांमध्ये भविष्यात त्यांचे मूळ मूल्यांकन साध्य करण्याची आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता असते. ज्यांना दीर्घ मुदतीत जास्त परतावा हवा आहे त्यांच्यासाठी व्हॅल्यू फंड फायदेशीर आहेत.

Web Title: large mid small flexi and value funds which one has the lowest risk and which one gives the highest returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.