Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP?

गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP?

SIP Calculator : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी आणि पद्धतशीर मार्ग मानला जातो. तुम्ही नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक राखली पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:59 IST2026-02-25T12:39:51+5:302026-02-25T12:59:57+5:30

SIP Calculator : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी आणि पद्धतशीर मार्ग मानला जातो. तुम्ही नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक राखली पाहिजे.

How to Build a ₹10 Lakh Corpus in 5 Years through SIP? Calculation & Planning Guide | गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP?

गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP?

SIP Calculator : आपल्या आयुष्यात घर खरेदी, मुलांचे शिक्षण किंवा भविष्यातील इतर गरजांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. जर तुमचे उद्दिष्ट येत्या ५ वर्षांत १० लाख रुपये जमा करण्याचे असेल, तर योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक हाच यशाचा मार्ग आहे. यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो.

एसआयपी म्हणजे काय?
'सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' म्हणजेच एसआयपी हा गुंतवणुकीचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी (उदा. महिना किंवा तिमाही) निश्चित रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात. यामुळे बाजारातील चढ-उतारांची जोखीम कमी होते आणि दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यास मदत होते.

परताव्याचे गणित: चक्रवाढ व्याजाची जादू
म्युच्युअल फंड हे बाजाराशी संबंधित असल्याने परताव्याची कोणतीही निश्चित मर्यादा नसते. मात्र, ऐतिहासिक आकडेवारीनुसार, इक्विटी ओरिएंटेड फंड्सनी सरासरी १२% वार्षिक परतावा दिला आहे. चांगल्या कामगिरी करणाऱ्या फंड्सनी १५ ते १८ टक्क्यांहून अधिक परतावा दिल्याचीही उदाहरणे आहेत.

१० लाख रुपये जमा करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
जर आपण वार्षिक १२% ते १५% परताव्याचा अंदाज धरला, तर ५ वर्षांचे कॅल्क्युलेशन खालीलप्रमाणे असेल.

परताव्याचा दरमासिक एसआयपी (SIP)५ वर्षांनंतरचा एकूण निधीतुमची गुंतवणूकमिळालेला परतावा
१२% (सरासरी)१२,२००१०,०६,३३४७,३२,००० २,७४,३३४ 
१५% (चांगला)११,२०० १०,०४,४५५६,७२,०००३,३२,४५५


(टीप: वरील आकडेवारी केवळ उदाहरणादाखल आहे, बाजारानुसार परतावा बदलू शकतो.)

गुंतवणुकीचे फायदे
रुपया कॉस्ट एव्हरेजिंग: बाजार पडलेला असताना जास्त युनिट्स आणि बाजार वधारलेला असताना कमी युनिट्स मिळतात, ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी किंमत संतुलित राहते.
कंपाउंडिंगचा फायदा: तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक कराल, तितका तुमच्या नफ्यावरही नफा (चक्रवाढ व्याज) मिळत जातो.

वाचा - ५० हजार पगार असलेल्यांसाठी 'टॉप ५' बजेट कार! टाटा पंचपासून किया सिरोसपर्यंत पाहा किमती

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : निवेश का 'सुपर' प्लान: 5 साल में ₹10 लाख के लिए कितनी मासिक एसआईपी?

Web Summary : SIP के माध्यम से 5 वर्षों में ₹10 लाख प्राप्त करें। व्यवस्थित निवेश योजनाएँ अनुशासित वृद्धि प्रदान करती हैं। इक्विटी फंड औसतन 12% रिटर्न देते हैं। मासिक निवेश रिटर्न अपेक्षाओं के साथ बदलता रहता है। रुपये की लागत औसत और चक्रवृद्धि से लाभ।

Web Title : Investment 'Super' Plan: Monthly SIP Needed for ₹10 Lakhs in 5 Years?

Web Summary : Achieve ₹10 lakhs in 5 years through SIP. Systematic Investment Plans offer disciplined growth. Equity funds yield average 12% returns. Monthly investment varies with return expectations. Benefit from rupee cost averaging and compounding.