Lokmat Money >म्युच्युअल फंड > तुमचे ३ वर्षांचे मुल कॉलेजला जाईपर्यंत होईल कोट्यधीश; गुंतवणुकीचा 'हा' फॉर्म्युला येईल कामी

तुमचे ३ वर्षांचे मुल कॉलेजला जाईपर्यंत होईल कोट्यधीश; गुंतवणुकीचा 'हा' फॉर्म्युला येईल कामी

Financial Tips: काळाबरोबर लोकांच्या गरजा आणि खर्चही झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, लवकरात लवकर आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:46 IST2025-04-06T12:45:24+5:302025-04-06T12:46:41+5:30

Financial Tips: काळाबरोबर लोकांच्या गरजा आणि खर्चही झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, लवकरात लवकर आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

how to build a corpus of 1 crore for your child this 15 years financial | तुमचे ३ वर्षांचे मुल कॉलेजला जाईपर्यंत होईल कोट्यधीश; गुंतवणुकीचा 'हा' फॉर्म्युला येईल कामी

तुमचे ३ वर्षांचे मुल कॉलेजला जाईपर्यंत होईल कोट्यधीश; गुंतवणुकीचा 'हा' फॉर्म्युला येईल कामी

Financial Tips: प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. आपल्यावर आलेली वेळ मुलांवर येऊ नये यासाठी पालक रात्रंदिवस झटत असतात. मात्र, फक्त पैसे कमावले म्हणजे मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित होईल असं नाही. तर तुमची कमाई योग्य ठिकाणी गुंतवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ३ वर्षांपेक्षा लहान असेल आणि ते कॉलेजला जाईपर्यंत कोट्यधीश व्हावे असे वाटत असेल, तर आतापासून तुम्हाला त्याच्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल. यासाठी तुमचे खूप उत्पन्न असावे असे नाही. तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही लहान बचत करून १५ वर्षांत १ कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता.

गुंतवणुकीचा मंत्र एसआयपीने होईल साध्य
गेल्या काही वर्षाती एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा भविष्यासाठी मोठा निधी तयार करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग मानला जात आहे. यात गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीने वाढत असल्याने कमी कालावधीतही चांगला निधी उभा राहतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही एक दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रिया आहे. गुंतवणुकीवरील परताव्याचा इतिहास पाहिल्यास, गुंतवणूकदारांनी १२ ते १८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळवला आहे. मुलांसाठी १ कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक महिन्याला १६५०० रुपये SIP मध्ये १५ वर्षांसाठी गुंतवावे लागतील. समजा तुम्हाला त्यावर १५% परतावा मिळाला, तर तुमची गुंतवणूक २९.७० लाख रुपये होईल, तर तुम्हाला १,०१,७०,०३२ रुपये मिळतील.

हा फॉर्म्युल्याने जमा होईल ५ कोटी रुपये
एसआयपीचा फॉर्म्युला वापरुन केवळ १ कोटी रुपयेच नाही तर ५ कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. फंड्स इंडिया रिसर्चच्या अहवालानुसार, जर तुम्ही दरमहा ३०,००० रुपये वाचवले आणि ते एसआयपीमध्ये गुंतवले आणि त्यात दरवर्षी १० टक्के वाढ केली, तर तुम्हाला १२ टक्के दराने परतावा मिळाला तरीही तुम्ही १९ वर्षांत ५ कोटी रुपये गोळा करू शकता. विशेष बाब म्हणजे या मोठ्या फंडाचे पहिले ५० लाख रुपये तुम्हाला ७ वर्षांच्या गुंतवणुकीदरम्यान मिळतील.

तुम्ही फक्त १० वर्षात १ कोटी रुपये जमा करू शकता
होय, तुम्ही कमी वेळातही १ कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीचे सूत्र बदलावे लागेल. तुम्ही या फॉर्म्युल्यासह SIP गुंतवणूक सुरू ठेवल्यास, तुमच्या फंडात जमा होण्यासाठी दुसरे ५० लाख रुपये आणि तिसऱ्या ५० लाखांसाठी फक्त २ वर्षे लागतील. याचा अर्थ असा की मासिक ३०,००० रुपयांच्या गुंतवणुकीसह आणि १० टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह १२ टक्के परतावा दिल्यास, १० वर्षांत तुमचे १ कोटी रुपये जमा होतील. १९व्या वर्षापर्यंत तुमची ठेव चक्रवाढीसह ५ कोटी रुपये होईल.

वाचा - ट्रम्प टॅरिफनंतर टाटा कंपनीने अमेरिकेत कार निर्यात थांबवली; का घेतला इतका मोठा निर्णय?

(Disclaimer- यामध्ये म्युच्युअल फंडातील एसआयपीच्या गुंतवणुकीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: how to build a corpus of 1 crore for your child this 15 years financial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.