Lokmat Money >म्युच्युअल फंड > SIP मध्ये दरमहा ₹५००० जमा केल्यास २० वर्षांनी किती रिटर्न मिळेल, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

SIP मध्ये दरमहा ₹५००० जमा केल्यास २० वर्षांनी किती रिटर्न मिळेल, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

Mutual Fund SIP Investment : मुलांचं शिक्षण, लग्न, घर अशा भविष्यातील गरजांसाठी गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायद्यात राहाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:38 IST2024-12-26T13:38:26+5:302024-12-26T13:38:26+5:30

Mutual Fund SIP Investment : मुलांचं शिक्षण, लग्न, घर अशा भविष्यातील गरजांसाठी गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायद्यात राहाल.

How much return will you get after 20 years if you deposit rs 5000 every month in mutual fund SIP see the complete calculation | SIP मध्ये दरमहा ₹५००० जमा केल्यास २० वर्षांनी किती रिटर्न मिळेल, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

SIP मध्ये दरमहा ₹५००० जमा केल्यास २० वर्षांनी किती रिटर्न मिळेल, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

Mutual Fund SIP Investment : मुलांचं शिक्षण, लग्न, घर अशा भविष्यातील गरजांसाठी गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायद्यात राहाल. आजच्या काळात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी चांगला पर्याय शोधत असाल तर म्युच्युअल फंड एसआयपी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. आज आपण येथे जाणून घेणार आहोत की जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा ५००० रुपये जमा केले तर २० वर्षांनंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल? 

एसआयपीचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही कमी वयात ती सुरू करता आणि जास्तीत जास्त काळ चालवता. तुम्ही दर महिन्याला किती पैसे गुंतवत आहात, किती वर्षे गुंतवणूक करत आहात आणि दरवर्षी कोणत्या दरानं परतावा मिळत आहे, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर एसआयपीमधून मिळणारा परतावा अवलंबून असतो.

५००० च्या गुंतवणूकीवर किती नफा?

जर तुम्ही ५००० रुपयांची एसआयपी करत असाल आणि तुम्हाला दरवर्षी सरासरी १२% परतावा मिळत असेल तर २० वर्षांनंतर तुमच्याकडे जवळपास ४९.९५ लाख रुपयांचा कॉर्पस असेल. या रकमेत तुमच्या गुंतवणुकीचे १२ लाख रुपये आणि परताव्याचे सुमारे ३७.९५ लाख रुपये यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी सरासरी १५ टक्के परतावा मिळाल्यास २० वर्षांनंतर तुम्ही एकूण ७५.७९ लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. या रकमेत तुमच्या गुंतवणुकीचे १२ लाख रुपये आणि परताव्यापोटी सुमारे ६३.७९ लाख रुपये यांचा समावेश आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: How much return will you get after 20 years if you deposit rs 5000 every month in mutual fund SIP see the complete calculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.