Lokmat Money >म्युच्युअल फंड > फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन

फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन

Investment Tips : पती-पत्नी दोघांनी योग्य आर्थिक नियोजन केलं तर १० वर्षात तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:27 IST2025-08-19T16:16:40+5:302025-08-19T16:27:54+5:30

Investment Tips : पती-पत्नी दोघांनी योग्य आर्थिक नियोजन केलं तर १० वर्षात तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता.

How Couples Can Become Crorepati in 10 Years with Smart Investments | फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन

फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन

Investment Tips : महागाईच्या या युगात आर्थिक नियोजन करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. असे असतानाही, योग्य गुंतवणुकीने भविष्यासाठी मोठा निधी (फंड) तयार करणे शक्य आहे. एका आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, जर पती आणि पत्नी दोघांनी मिळून गुंतवणूक केली, तर केवळ १० वर्षांत तब्बल १.२४ कोटी रुपयांचा फंड तयार करता येतो.

१० वर्षांत १.२४ कोटी रुपयांचा फंड कसा तयार कराल?
एका आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, दरमहा दीड लाख रुपये कमावणारे जोडपे हे सहज साध्य करू शकतात. त्यांनी या गुंतवणुकीसाठी एक खास योजना शेअर केली आहे, ज्यात डेट, हायब्रीड आणि इक्विटी म्युच्युअल फंड यांचा समावेश आहे. थोड्या प्रमाणात डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, महानगर शहरांमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी अनेक मोठे खर्च असतात, जसे की घरभाडे, किराणा, विमा, EMI इत्यादी. त्यामुळे लाखोंमध्ये कमाई असूनही बचत करणे कठीण जाते. मात्र, खर्चाचे योग्य नियोजन केल्यास दरमहा ५३ हजार रुपयांची बचत करणे शक्य आहे.

खर्चाचे गणित आणि बचतीची योजना
एका आर्थिक तज्ज्ञांनी दरमहा दीड लाख रुपये कमावणाऱ्या जोडप्यासाठी खालीलप्रमाणे खर्चाचे गणित मांडले आहे.

  • आरोग्य विमा : ३,५०० (५० लाख रुपयांचे कव्हर)
  • टर्म इन्शुरन्स : ३,५०० (१.५ कोटी रुपयांचे कव्हर)
  • घरभाडे आणि इतर खर्च : ६०,०००
  • घर आणि गाडीचा EMI : ३०,०००
  • एकूण खर्च: ९७,०००

यानुसार, दीड लाख रुपयांच्या उत्पन्नातून दरमहा ५३ हजार रुपयांची बचत होऊ शकते. याच बचतीला १० वर्षांसाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवून मोठी फंड जमा करता येईल

गुंतवणुकीचे नियोजन
या ५३ हजार रुपयांच्या बचतीचे योग्य वाटप करणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांनी यासाठी 'असेट अलोकेशन'ची खालीलप्रमाणे योजना दिली आहे.

  • शॉर्ट टर्मसाठी : दरमहा १५,००० रुपये डेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा.
  • मिडियम टर्मसाठी : दरमहा १५,००० रुपये हायब्रीड फंडमध्ये गुंतवा.
  • लाँग टर्मसाठी : दरमहा २०,००० रुपये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा.

वाचा - GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!

याशिवाय, दरमहा ३,००० रुपये सुरक्षा निधीमध्ये जमा करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे कमी वेळेत एक मोठा आर्थिक निधी तयार करणे शक्य होईल.

Web Title: How Couples Can Become Crorepati in 10 Years with Smart Investments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.