Lokmat Money >म्युच्युअल फंड > 'या' Mutual Fund नं १ लाखांचे केले १ कोटी रुपये, तुमचीही आहे का यात गुंतवणूक? कोणता आहे फंड?

'या' Mutual Fund नं १ लाखांचे केले १ कोटी रुपये, तुमचीही आहे का यात गुंतवणूक? कोणता आहे फंड?

Mutual Fund Investment : गेल्या काही वर्षांत काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या फंडाची सुरुवात १ जानेवारी १९९५ रोजी झाली आणि त्यानंतर या फंडानं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परताना दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:13 IST2025-01-02T11:13:36+5:302025-01-02T11:13:36+5:30

Mutual Fund Investment : गेल्या काही वर्षांत काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या फंडाची सुरुवात १ जानेवारी १९९५ रोजी झाली आणि त्यानंतर या फंडानं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परताना दिलाय.

HDFC Flexi Cap Fund Mutual Fund has turned Rs 1 lakh into Rs 1 crore do you also have an investment in it Which fund is it | 'या' Mutual Fund नं १ लाखांचे केले १ कोटी रुपये, तुमचीही आहे का यात गुंतवणूक? कोणता आहे फंड?

'या' Mutual Fund नं १ लाखांचे केले १ कोटी रुपये, तुमचीही आहे का यात गुंतवणूक? कोणता आहे फंड?

Mutual Fund Investment : गेल्या काही वर्षांत काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यापैकीच एक म्हणजे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड (HDFC Flexi Cap Fund). ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे, जी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. नुकतंच याला ३० वर्ष पूर्ण झाली.

वास्तविक, एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाची सुरुवात १ जानेवारी १९९५ रोजी झाली आणि त्यानंतर या फंडानं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परताना दिलाय. या फंडाने आतापर्यंत १९.१३ टक्के वार्षिक सरासरी परतावा (सीएजीआर) दिला आहे.

१ लाखाचे झाले १.८८ कोटी

२९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत, या फंडाच्या सुरुवातीला म्हणजे १९९५ मध्ये जर कोणी यात १ लाख रुपयांचीगुं तवणूक केली असती तर ती आतापर्यंत वाढून सुमारे १.८८ कोटी रुपये झाली असती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निफ्टी ५०० टीआरआयच्या बेंचमार्कपेक्षा हे १.५२ कोटी अधिक आहे. याशिवाय दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीद्वारे या फंडात गुंतवणूक केली असती (एकूण गुंतवणूक ३५.९० लाख रुपये झाली असती), तर आता परताव्यासह ती वाढून सुमारे २०.६५ कोटी रुपये झाली असती.

फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतविला जातो जो दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतो. याशिवाय फंडाची बॉटम-अप गुंतवणूक प्रक्रियाही मजबूत कंपन्यांवर आधारित आहे, जी मिड टर्म आणि लाँग टर्ममध्ये परतावा देऊ शकते. शिवाय, एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडात डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ आहे. म्हणजेच हा फंड आपला पोर्टफोलिओ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि सेगमेंटमध्ये विभागून गुंतवणूक करतो, ज्यामुळे जोखीम कमी होण्यास आणि स्थिर परतावा मिळण्यास मदत होते.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी योग्य ठरू शकते

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडानं दीर्घ मुदतीत उत्तम परतावा दिल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. याशिवाय या फंडाच्या डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओमुळे गुंतवणूकदारांना बाजारातील जोखमीपासूनही संरक्षण मिळालं आहे. मात्र, अशा फंडांमध्ये अनेकदा बाजाराला चढ-उतारांना सामोरं जावं लागतं. हेच कारण आहे की जर तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यात जास्त जोखीम सहन करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: HDFC Flexi Cap Fund Mutual Fund has turned Rs 1 lakh into Rs 1 crore do you also have an investment in it Which fund is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.