Investment Tips: प्रत्येक व्यक्तीनं गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. गुंतवणुकीतून तुम्ही केवळ पैसे गोळा करत नाही तर तुमचं भविष्यही सुरक्षित करता. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मासिक उत्पन्नातील काही भाग वाचवून गुंतवणूक केली पाहिजे. जरी तुम्ही कमी कमाई करत असाल तरी दर महा तुमच्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग वाचवून गुंतवणूक केली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया दरमहा ३०,००० रुपये कमावणारे लोक कसे आणि कुठे गुंतवणूक करू शकतात.
कुठे करता येऊ शकते गुंतवणूक?
आपले पैसे गुंतवण्यासाठी एसआयपीचा वापर करा, म्हणजेच दर महिन्याला तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवता. विशेष म्हणजे यात तुम्ही दरमहा २५० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. अशावेळी जे लोक कमी कमाई करतात ते देखील एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
१ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
एसआयपीमध्ये जर तुम्ही दीर्घकाळ दरमहिन्याला नियमित गुंतवणूक केली तर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा फंड जोडता येऊ शकतो. जर तुम्ही दरमहा ३०,००० रुपये कमवत असाल तर तुम्ही दरमहा ४००० रुपये सहज पणे वाचवू शकता आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
३० वर्षांत कोट्यवधींचा निधी
जर तुम्ही सलग ३० वर्षे एसआयपीमध्ये दरमहा ४००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही एसआयपीमध्ये एकूण १४,४०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये अंदाजे १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. १२ टक्के दरानं तुम्हाला ३० वर्षांनंतर एकूण १,२३,२३,८९३ रुपयांचा निधी मिळणार आहे. यात केवळ तुमच्या व्याजापोटी तुम्हाला मिळणाऱ्या १,०८,८४,८९३ रुपयांचा समावेश असेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)