SIP Investment: मुंबईत राहणारा एक मुलगा एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचा मासिक पगार साधारण ₹३०,००० आहे. दिवसभराची धावपळ आणि खर्चांमध्ये त्याला नेहमी वाटायचं की, इतक्या कमी पगारात आपले भविष्य कसं सुरक्षित करायचं?
भाडं, खाणं-पिणं आणि आवश्यक खर्चांनंतर त्याच्याकडे बचतीसाठी फारसे काही उरत नव्हते. पण, एक दिवस त्याला एक माहिती मिळाली. ज्यात सांगितलं होतं की, जर कोणी दरमहा ₹४००० ची SIP (Systematic Investment Plan) सुरू केली आणि त्यावर १२% वार्षिक परतावा मिळाला, तर ३० वर्षांत ₹१.२३ कोटींचा निधी तयार होऊ शकतो. हे ऐकून त्या मुलानंही ते करण्याचा निर्णय घेतला.
केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी या शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
₹४००० च्या SIP मधून ₹१.२३ कोटींचा फंड कसा तयार होईल?
त्या मुलानं तात्काळ आपल्या बँक खात्यातून दरमहा ₹४००० ची SIP सुरू केली. त्यानं एक दीर्घकालीन इक्विटी म्युच्युअल फंड निवडला, ज्याचा सरासरी परतावा सुमारे १२% वार्षिक होता. जर आपण गणना केली, तर ३० वर्षांत त्याची एकूण गुंतवणूक ₹१४,४०,००० (₹४००० × १२ महिने × ३० वर्षे) होईल. परंतु चक्रवाढीच्या शक्तीमुळे त्याला ₹१,०८,८३,८९३ चा परतावा मिळेल. अशा प्रकारे, त्याचा एकूण फंड ₹१,२३,२३,८९३ म्हणजेच १.२३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्या मुलासाठी ही केवळ गुंतवणूक नसून, भविष्याच्या सुरक्षिततेचा मार्ग होता.
SIP चा मार्ग का निवडला?
सुरुवातीला त्य मुलानं FD, RD आणि बचत खात्यासारखे पर्याय पाहिले. पण ६-७% व्याजदर पाहून त्याला वाटलं की निवृत्तीच्या वेळी ही रक्कम पुरेशी नसेल. तेव्हा त्याला जाणवलं की, जर त्यानं आपले पैसे म्युच्युअल फंडाद्वारे बाजारात गुंतवले, तर चक्रवाढीच्या शक्तीमुळे तो दीर्घकाळात जास्त फायदा मिळवू शकतो. त्याला सुरुवातीला वाटलं की ₹४००० नं काय होईल? पण जेव्हा त्याने SIP कॅल्क्युलेटरवर परिणाम पाहिला, तेव्हा त्याला खात्री झाली की वेळेनुसार छोटी रक्कमही मोठा फंड तयार करू शकते.
चक्रवाढीच्या शक्तीने विश्वास निर्माण केला
चक्रवाढीचा अर्थ असा आहे की, तुमच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजच नाही, तर व्याजावरही व्याज मिळते. म्हणजेच, दरवर्षी तुमचे पैसे आपोआप वाढत राहतात. जर त्या मुलानं दरवर्षी आपल्या SIP मध्ये १०% ची वाढ केली, म्हणजेच पुढील वर्षी ₹४४००, आणि नंतर ₹४८००, तर हा फंड आणखी वेगानं वाढून ₹२ कोटींपर्यंत पोहोचू शकतो.
विचारात बदल झाला
आधी तो मुलगा महिन्याच्या शेवटी बचत करायचा, पण आता त्यानं आपली सवय बदलली आहे. तो आधी खर्चा नंतर बचत करायचा, पण आता बचतीनंतर खर्च करतो. तो दर महिन्याच्या पहिल्या तारखेला SIP साठी ऑटो-डिडक्शन ठेवतो. यामुळे तो केवळ एक शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनला नाही, तर त्याला मानसिक शांतता देखील मिळाली आहे की त्याचे भविष्य सुरक्षित आहे.
६० व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य
त्या मुलानं ही SIP या विचारानं सुरू केली की ३५ वर्षांनंतर, जेव्हा तो ६० वर्षांचा होईल, तेव्हा त्याच्याकडे कोट्यवधींचा फंड असेल. निवृत्तीनंतर त्याला कोणावरही अवलंबून राहावं लागू नये, अशी त्याची इच्छा आहे. त्याचं उद्दिष्ट केवळ निवृत्ती निधी नाही, तर एक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन निर्माण करणं आहे.
छोटी सुरुवात, मोठा परिणाम
त्या मुलाची कहाणी सांगते की कोट्यधीश होण्यासाठी मोठा पगार आवश्यक नाही, तर नियमित गुंतवणूक आणि संयम आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती महिन्याच्या ₹४००० च्या SIP नं सुरुवात करते आणि ती दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवते, तर ती सहजपणे कोट्यवधींचा फंड तयार करू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
