Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > मोठी अपडेट : ३ वर्षांत पहिल्यांदाच म्युच्युअल फंडांनी ₹४,१०० कोटींच्या शेअर्सची केली विक्री, प्रकरण काय?

मोठी अपडेट : ३ वर्षांत पहिल्यांदाच म्युच्युअल फंडांनी ₹४,१०० कोटींच्या शेअर्सची केली विक्री, प्रकरण काय?

Mutual Funds Stocks Sold: फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत म्युच्युअल फंडांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे ४,१०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. पाहा काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:54 IST2026-02-16T12:53:48+5:302026-02-16T12:54:47+5:30

Mutual Funds Stocks Sold: फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत म्युच्युअल फंडांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे ४,१०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. पाहा काय आहे यामागचं कारण?

Big update For the first time in 3 years mutual fund houses sell shares worth rs 4100 crore whats the deal | मोठी अपडेट : ३ वर्षांत पहिल्यांदाच म्युच्युअल फंडांनी ₹४,१०० कोटींच्या शेअर्सची केली विक्री, प्रकरण काय?

मोठी अपडेट : ३ वर्षांत पहिल्यांदाच म्युच्युअल फंडांनी ₹४,१०० कोटींच्या शेअर्सची केली विक्री, प्रकरण काय?

Mutual Funds Stocks Sold: फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत म्युच्युअल फंडांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे ४,१०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं आहे की, सातत्यानं खरेदी करणारे म्युच्युअल फंड निव्वळ विक्रेते बनले आहेत. 

या महिन्यातील सात व्यापारी सत्रांपैकी सहा सत्रांमध्ये त्यांनी शेअर्सची विक्री केली. याआधी एप्रिल २०२३ मध्ये म्युच्युअल फंडांनी ४,५३२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स विकले होते, परंतु त्यानंतर सलग ३४ महिने त्यांनी बाजारात खरेदीचा ओघ कायम ठेवला होता. हा बदल गेल्या काही महिन्यांतील खरेदीच्या कलानुसार पूर्णपणे विरुद्ध आहे, कारण जानेवारी २०२६ मध्येच फंडांनी ४२,३५५ कोटी रुपयांची खरेदी केली होती आणि संपूर्ण २०२५ वर्षात त्यांनी सुमारे ४.९३ लाख कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.

काय आहे SCSS? टॅक्समध्ये ₹१.५ लाखांची बचत आणि वरुन महिन्याला ₹२०,००० ची कमाई, जाणून घ्या 

विक्रीमागची नेमकी कारणं आणि तज्ज्ञांचं मत

बाजार तज्ज्ञांच्या मते, ही विक्री गुंतवणूकदारांकडून पैसे काढण्याच्या दबावामुळे नसून पोर्टफोलिओमध्ये केलेल्या बदलांमुळे होत आहे. डी.आर. चोकसी फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक देवेन चोकसी यांनी मनीकंट्रोलला सांगितलं की, फंड सध्या आपल्या पोर्टफोलिओला संतुलित करत आहेत. कमी कामगिरी करणाऱ्या शेअर्समधून पैसे काढून ते दर्जेदार शेअर्समध्ये, विशेषतः मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा परदेशी गुंतवणूकदार बाजार सोडून जात होते, तेव्हा फंडांनी जे शेअर्स खरेदी केले होते, त्यापैकी काहींची आता विक्री केली जात आहे. ही हालचाल केवळ नफा वसुली आणि पोर्टफोलिओ फेररचनेशी संबंधित असल्याचं दिसून येतं.

विक्रीचं प्रमाण आणि तांत्रिक घटक

आनंद राठी वेल्थचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अझीझ यांच्या मते, या विक्रीचं प्रमाण खूप मोठे आहे असं समजण्याचे कारण नाही. सुमारे ४० लाख कोटी रुपयांचं व्यवस्थापन करणाऱ्या या क्षेत्रासाठी ४,१०० कोटी रुपयांची विक्री ही तुलनेने खूप छोटी बाब आहे. या विक्रीमागे निर्देशांकातील बदल (इंडेक्स रीबॅलेंसिंग) हे देखील एक कारण असू शकतं. ३१ जानेवारी ही एनएसई निर्देशांकाच्या पुनरावलोकनाची तारीख होती आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला एमएससीआयनं (MSCI) देखील आपल्या निर्देशांकात बदल जाहीर केले होते. आता मुख्यत्वे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ कायम राहतो की नाही. जर सातत्याने पैसे बाहेर पडले आणि फंडांनी विक्री सुरू ठेवली, तर त्याचे परिणाम वेगळे असू शकतात.

बाजारावर होणारा परिणाम आणि सद्यस्थिती

द टीएचई वेल्थ कंपनीचे बाजार रणनीती प्रमुख अक्षय चिंचलकर यांच्या मते, भारत-अमेरिका व्यापार करार आणि कृषी वस्तूंशी संबंधित बदल देखील गुंतवणुकीच्या कल प्रभावित करू शकतात. भौगोलिक-राजकीय अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांचा कल गोल्ड ईटीएफ, बाँड फंड आणि हायब्रीड फंडांकडे वाढला आहे. बाजारात सध्या स्पष्ट तफावत दिसून येत असून निफ्टी ५०० निर्देशांक त्याच्या उच्चांकावरून ३.४ टक्क्यांनी खाली असला तरी, या निर्देशांकातील जवळपास ५० टक्के कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून २० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांची रुची अधूनमधून दिसत असली तरी, सातत्यपूर्ण गुंतवणुकीसाठी रुपयाची स्थिरता आणि योग्य मूल्यांकन आवश्यक असेल.

Web Title : म्यूचुअल फंड्स ने 3 साल बाद शेयर बेचे: क्या है मामला?

Web Summary : म्यूचुअल फंड्स ने फरवरी में ₹4,100 करोड़ के शेयर बेचे, जो तीन साल में पहली बार है। विशेषज्ञों का कहना है कि यह पोर्टफोलियो को संतुलित करने के लिए किया गया है, पहले की खरीदारी के बाद इंडेक्स रीबैलेंसिंग भी एक कारण है।

Web Title : Mutual Funds Sell Shares After 3 Years: What's the Matter?

Web Summary : Mutual funds sold ₹4,100 crore worth of shares in February, a first in three years. Experts attribute this to portfolio rebalancing from underperforming to quality stocks, following earlier buying sprees. Index rebalancing also plays a role.