Lokmat Money > बिझनेस न्यूज > एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

Monk to Entrepreneur : एका संन्याशापासून ते एका यशस्वी उद्योजकापर्यंतचा शोभितचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:39 IST2025-06-25T14:37:54+5:302025-06-25T14:39:19+5:30

Monk to Entrepreneur : एका संन्याशापासून ते एका यशस्वी उद्योजकापर्यंतचा शोभितचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Monk to Entrepreneur Shobhit Kumar Singh's ₹120 Cr Business Success Story | एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

Monk to Entrepreneur : काही लोक त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी करून दाखवतात की त्यांची कथा ऐकून आपण थक्क होतो. आज आम्ही तुम्हाला कानपूर येथील रहिवासी शोभित कुमार सिंह यांच्या अशाच एका अविश्वसनीय प्रवासाबद्दल सांगणार आहोत. शोभित कुमार आज एक यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांच्या कंपनीची उलाढाल तब्बल १२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, शोभित यांनी कधीकाळी संन्यासी जीवन स्वीकारले होते, पण कुटुंबाच्या आग्रहामुळे ते पुन्हा घरी परतले आणि आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली.

एमबीए, नोकरी, मग संन्यास...
शोभित कुमार यांचा जन्म कानपूरमधील एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांनी १९९७ मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली आणि त्यानंतर एमबीएही पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना दिल्लीतील एका जर्मन सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरी मिळाली. पण शोभितचे मन नेहमीच धर्मांचा अभ्यास करण्याकडे अधिक ओढले जात होते.

आपल्या याच धार्मिक ओढ्यांमुळे, वयाच्या २६ व्या वर्षी शोभितने नोकरी सोडली आणि संन्यासी बनले. ते घर सोडून ऋषिकेश येथील महर्षी महेश योगींच्या आश्रमात राहू लागले. मात्र, जवळपास १८ महिन्यांनंतर, त्यांच्या पालकांच्या सततच्या आग्रहामुळे शोभित घरी परतले. घरी आल्यावर त्यांनी लग्न केले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. शोभितच्या पत्नीचे कुटुंब व्यवसायात होते, त्यामुळे शोभितनेही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

'स्टोन सफायर इंडिया' : एका संन्याशाचे १०० कोटींचे साम्राज्य
व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर, शोभितने २०१६ मध्ये आपल्या 'स्टोन सफायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची सुरुवात केली. 'मेक इन इंडिया' संकल्पनेवर आधारित स्टेशनरी आणि खेळण्यांचा ब्रँड तयार करण्यात या कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली. ही कंपनी केवळ स्टेशनरी आणि खेळणीच नाही, तर खेळ आणि घरगुती उत्पादनेही बनवते.

वाचा - विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?

आज, शोभित कुमार सिंह यांच्या 'स्टोन सफायर इंडिया' कंपनीची उलाढाल १२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. या कंपनीकडे ५०० हून अधिक स्टॉक-कीपिंग युनिट्स (SKU) आहेत, जे त्यांच्या उत्पादनांच्या विविधतेची आणि बाजारातील यशस्वी उपस्थितीची साक्ष देतात.

Web Title: Monk to Entrepreneur Shobhit Kumar Singh's ₹120 Cr Business Success Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.