lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > लॅपटॉप-कॅमेऱ्यासह 20 प्रोडक्ट्स महागणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लॅपटॉप-कॅमेऱ्यासह 20 प्रोडक्ट्स महागणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

यासह काही स्टील वस्तूंवर इम्पोर्ट लायसन्सिंग (Import Licensing)लादले जात आहे, जे चीनकडून आयातीवर बंदी आणण्याच्या उचललेल्या पावलामुळे लादले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:40 PM2020-08-11T14:40:55+5:302020-08-11T14:41:14+5:30

यासह काही स्टील वस्तूंवर इम्पोर्ट लायसन्सिंग (Import Licensing)लादले जात आहे, जे चीनकडून आयातीवर बंदी आणण्याच्या उचललेल्या पावलामुळे लादले जातील.

modi government planning to increase custom duty on textiles cameras laptops due to import licensing | लॅपटॉप-कॅमेऱ्यासह 20 प्रोडक्ट्स महागणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लॅपटॉप-कॅमेऱ्यासह 20 प्रोडक्ट्स महागणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्लीः जर आपण लॅपटॉप, कॅमेरा किंवा अ‍ॅल्युमिनियम उत्पादन (Laptop and Camera can get  Costly soon) खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर आपल्याला ही महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच लॅपटॉप, कॅमेरा, वस्त्रोद्योग आणि अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांसह 20 उत्पादनांवर कस्टम ड्युटी(Modi Government may increase custom duty) वाढविण्याच्या विचारात आहे. यासह काही स्टील वस्तूंवर इम्पोर्ट लायसन्सिंग (Import Licensing)लादले जात आहे, जे चीनकडून आयातीवर बंदी आणण्याच्या उचललेल्या पावलामुळे लादले जातील.

वित्त मंत्रालयाने कस्टम ड्युटी वाढवण्याचा दिला प्रस्ताव
सद्यस्थितीत कस्टम ड्युटी वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर आहे, ज्यांनी यापूर्वीच वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून आलेला हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.  ETमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वेन्यू विभाग काही शुल्क जाहीर करण्याच्या तयारीत आहे. अधिका-याने ईटीला सांगितले की, ही केवळ चीनवर लादली जाणारी ड्युटी नाही, तर कस्टम ड्युटी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात केल्या जाणार्‍या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून हे आयात शुल्क वाढवण्यात येणार आहे. 

मुक्त व्यापार करारासह देशांकडून बऱ्याच वस्तू केल्या जातात आयात
चीनकडून संबंध बिघडल्यानंतर अलीकडच्या काही आठवड्यांत सरकारला असे आढळले आहे की, मुक्त व्यापार करारांतर्गत देशांकडून विशेषत: व्हिएतनाम आणि थायलंडसारख्या देशांकडून बरीच आयात केली जात आहे.

काही स्टील उत्पादनांच्या आयातीवरही बंदी घातली होती.
महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने वाणिज्य विभागाने टायर व टीव्हीसारख्या वस्तूंवर आयात परवाना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर परवाना देणार्‍या एजन्सी डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने काही स्टील उत्पादने आयात करण्यासही निर्बंध लादले आहेत. आयातबंदीशिवाय मोदी सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी देखील घातली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेवर झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर हे सर्व घडले आहे, ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते.

Web Title: modi government planning to increase custom duty on textiles cameras laptops due to import licensing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.