Milk Rate: सरकारनं सुमारे ४०० वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यानंतर, २२ तारखेपासून पॅक केलेल्या दुधाच्या दरात ३ ते ४ रुपयांची कपात होऊ शकते असं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालंय. दूधावरील जीएसटी पाच टक्क्यांवरून शून्य केल्यामुळे अमूल आणि मदर डेअरीसह सर्व कंपन्यांच्या पॅक केलेल्या दुधाच्या किमती प्रति लिटर चार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.
परंतु अमूलनं दुधाचे दर कमी होणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय. कंपनीच्या म्हणण्यानुसार २२ सप्टेंबरनंतर अमूल दुधाचे दर कमी होणार नाहीत. पॅक केलेल्या दुधावरील जीएसटी आधीच शून्य आहे. त्यामुळे किमती कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
"ताज्या दुधाच्या किंमतीत कोणताही बदल प्रस्तावित नाही. कारण त्यात कोणताही जीएसटी कमी करण्यात आलेला नाही. पाऊचमधील दुधावर कायमच शून्य जीएसटी होता," अशी प्रतिक्रिया गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली. सरकारनं अल्ट्रा हाय ट्रेम्परेचर म्हणजेच यूएचटी दुधावरील जीएसटी ५ टक्क्यांवरून शून्यावर आणलाय. २२ सप्टेंबरपासून केवळ हेच दूध स्वस्त होईल, असंही ते म्हणाले. वृत्तसंस्था एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
यूएचटी दूध म्हणजे काय?
यूएचटी म्हणजे अल्ट्रा-हाय टेम्परेचर दूध, ज्याला आपण यूएचटी दूध म्हणतोय ते काही सेकंदांसाठी कमीतकमी १३५ डिग्री सेल्सियस (२७५ डिग्री फॅरेनहाइट) पर्यंत गरम केलं जातं, यामुळे जवळजवळ सर्व सूक्ष्मजीव नष्ट होतात. टेट्रा पॅकसारख्या पॅकेजिंगसह, यूएचटी दूध कोणत्याही रेफ्रिजरेशनशिवाय महिनाभर सुरक्षित ठेवता येतं.