भूषण श्रीखंडे/सचिन लुंगसे
जळगाव/मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी वाढ झाली, तर चांदीचा भाव मात्र स्थिर राहिला. अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार झाली. मंगळवारी जीएसटीसह सोने ९६, ५०० रुपये तोळा, तर चांदी ९८ हजार रुपये किलो असा भाव होता.
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
हिऱ्यांच्या तुलनेत सोन्यालाच अधिक मागणी आहे. याचे कारण सोन्यात परतावा अधिक मिळतो. लग्नसराईमुळे आजच्या अक्षय तृतीयेला सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी होईल.
कुमार जैन, सोने व्यापारी हिरेजडित दागिन्यांना पसंती
ग्राहक परंपरा म्हणून नाही, तर स्टाइल म्हणून हिरे खरेदी करतात. रोजच्या वापरासाठी डिझाइनचे स्टायलिश हिऱ्यांकडे ग्राहकांचा ओढा आहे. सॉलिटेअरमध्ये सुंदर दिसतील अशा हिऱ्यांना मागणी असते.
अक्षय्य तृतीयेलाही हिरेजडीत दागिन्यांची खरेदी होईल, असा कयास आहे. चमक, टिकाऊपणामुळे हिरे दागिन्यांमध्ये वापरले जातात. कानातले, नाकातले, अंगठी, एंगेजमेंट रिंग, पेंडेंटमध्येही हिरे वापरले जातात.
अंगठी, नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी, दशांगुळे यात हिरे वापरले जातात. सुवर्णफूल, मोद, बिंदी, अग्रफूल, चांदीची / सोन्याची वेणी, तुरा, केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्नफुले यात हिऱ्यांचा वापर केला जातो.