Lokmat Money > बिझनेस न्यूज > JSW ची महाराष्ट्रात महागुंतवणूक; ३५ हजार ५०० कोटींचे प्रकल्प, हजारो रोजगारांची निर्मिती

JSW ची महाराष्ट्रात महागुंतवणूक; ३५ हजार ५०० कोटींचे प्रकल्प, हजारो रोजगारांची निर्मिती

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:46 AM2021-09-15T05:46:13+5:302021-09-15T05:46:39+5:30

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

jsw invests heavily in Maharashtra 35500 crore project creation of thousands of jobs pdc | JSW ची महाराष्ट्रात महागुंतवणूक; ३५ हजार ५०० कोटींचे प्रकल्प, हजारो रोजगारांची निर्मिती

JSW ची महाराष्ट्रात महागुंतवणूक; ३५ हजार ५०० कोटींचे प्रकल्प, हजारो रोजगारांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नामांकित जेएसडब्ल्यू उद्योग समूह महाराष्ट्रात जलविद्युत व पवन ऊर्जा क्षेत्रात ३५ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 
जेएसडब्ल्यू उद्योग समूहाशी मंगळवारी झालेल्या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली.  उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रवीण पुरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रकल्प असे...

- १५०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प 

कुठे : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर

गुंतवणूक : ५,५०० कोटी रुपये

- ५००० मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प

कुठे : कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत 

गुंतवणूक : ३० हजार कोटी रुपये

प्रकल्प उभारणी : १८७९ हेक्टर जागेवर केली जाईल.
 

Web Title: jsw invests heavily in Maharashtra 35500 crore project creation of thousands of jobs pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.