Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुन्या कारच्या बाजारातील तेजीमुळे रोजगारनिर्मिती!

जुन्या कारच्या बाजारातील तेजीमुळे रोजगारनिर्मिती!

वाहन विक्री घटल्यामुळे कार उत्पादक कंपन्या नोकरकपात करीत असतानाच जुन्या कारच्या (युज्ड् कार) बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:13 AM2019-11-14T05:13:19+5:302019-11-14T05:13:35+5:30

वाहन विक्री घटल्यामुळे कार उत्पादक कंपन्या नोकरकपात करीत असतानाच जुन्या कारच्या (युज्ड् कार) बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे.

Jobs created by old car market boom! | जुन्या कारच्या बाजारातील तेजीमुळे रोजगारनिर्मिती!

जुन्या कारच्या बाजारातील तेजीमुळे रोजगारनिर्मिती!

चेन्नई : वाहन विक्री घटल्यामुळे कार उत्पादक कंपन्या नोकरकपात करीत असतानाच जुन्या कारच्या (युज्ड् कार) बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. जुन्या कार बाजारात आता मोठ्या कार उत्पादक कंपन्याही उतरलेल्या असून, या संघटित विक्रेत्यांमुळे रोजगाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत.
वाहन अभियंते आणि पदविकाधारकांची भरती या क्षेत्रात चांगल्या प्रकारे होत आहे. सूत्रांनी सांगितले की, जुन्या कारच्या खरेदी-विक्रीचा बाजार सध्याच्या घडाली झपाट्याने वृद्धी पावत आहे. गेल्या वर्षभरात जुन्या कारच्या मागणीत १२ ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या क्षेत्रात ‘टेक्निकल इव्हॅल्यूएटर’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. नोकर भरती अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागणीतील वाढ दोन अंकी आहे. मागणी छोट्या प्रमाणात असली तरी पुढील दोन ते तीन तिमाहींत ती कायम राहणार आहे.
महिंद्रा फर्स्ट चॉई व्हिल्सचे सीईओ आशुतोष पांडे यांनी सांगितले की, मोठ्या शहरातील जुन्या कार डीलरकडून वाहन निरीक्षक आणि इतर पदांसाठी औपचारिक मार्गाने होणाºया भरतीत मोठी वाढ झाली आहे. अनौपचारिक पातळीवरील भरतीचे प्रमाण मात्र यापेक्षाही खूप अधिक आहे. महिंद्राचा स्वत:चा वाहन समीक्षा व्यवसाय आहे.
जुन्या वाहनांचा विक्री बाजार आणि विमा व वित्त कंपन्या यांच्यासाठी आम्ही काम करतो. या क्षेत्रात आमचा बाजारहिस्सा ४५ टक्के आहे. यंदा आम्ही २ दशलक्ष वाहनांची समीक्षा केली. यापैकी बहुतांश तपासणीची कामे मुक्त (फ्रिलान्सर) निरीक्षकांकडून करून घेण्यात आली आहेत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
>एचआर संस्था टीमलीजच्या आकडेवारीनुसार, सध्या संघटित जुन्या कार उद्योगात १0 हजार लोकांना थेट रोजगार मिळालेला आहे. छोट्या शहरांत संधी अधिक आहेत.
>छोट्या शहरांमध्ये वाढ
आशुतोष पांडे यांनी सांगितले, गेल्या वर्षी आमच्या हजेरीपटावर १00 जण होते तसेच २,४00 जण मुक्त निरीक्षक होते. यंदा मुक्त निरीक्षकांची संख्या ४ हजारांवर गेली आहे. यातील बहुतांश वाढ छोट्या शहरांतून आली आहे.

Web Title: Jobs created by old car market boom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.