JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:18 AM2021-06-17T11:18:10+5:302021-06-17T11:18:32+5:30

State Bank of India And Job : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे.

JOB Alert sbi sco recruitment 2021 here full bank jobs details | JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

Next

नवी दिल्ली - सरकारी बँकेतनोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी (SBI SCO Recruitment 2021) आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी आहे. याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 जूनपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयची अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in/ Careers वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून आहे. 

नोकरीचा तपशील (SBI Vacancy 2021 Details)

या नोकरीअंतर्गत जाहिरातींची संख्या CRPD / SCO-FIRE / 2020-21/32 आणि CRPD / SCO / 2021-22 / 06 अंतर्गत क्रमश: (इंजिनियर) (फायर) आणि मॅनेजर (नोकरी कुटुंब आणि उत्तराधिकारी योजना) समाविष्ट आहेत. इंजिनियर (फायर) आणि मॅनेजरच्या पदांच्या एकूण 16 जागा रिक्त आहेत.

डिसेंबर 2020 मध्ये सुरू झाले अर्ज

रेग्यूलर बेसिसवर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरला भरतीसाठी डिसेंबर 2020 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 पर्यंत होती. अधिकृत नोटिसनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही.

कोण करू शकतं अर्ज?

इंजिनियरियन फायर - यूजीसीकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआईसीटी द्वारे अनुक्रमित संस्थानातून नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपुरमध्ये बीई (फायर) या बी.टेक (सेफ्टी एंड फायर इंजीनियरिंग) / बी.टेक (फायर टेक्नोलॉजी अँड सेफ्टी इंजिनियरिंग) / बी.एससी (फायर) असणे आवश्यक आहे. इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (भारत / यूके) तून पदवी, नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपूरहून डिव्हीजनल ऑफिसर्स कोर्समध्ये पदवी असणे गरजेचे आहे.

मॅनेजर - कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमबीए / पीजीडीएम. त्याव्यतिरिक्त, मानव संसाधन क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. बँकर्स / एनबीएफसी (1 फेब्रुवारी 2021 पर्यंत) मानव संसाधन क्षेत्रात कमीतकमी 7 वर्षांचा अनुभव (इंटर्नशिप सहित) असणे गरजेचे आहे.

असा करा अर्ज

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://bank.sbi/web/careers किंवा https://www.sbi.co.in/web/careers वर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

निवड प्रक्रिया

योग्य उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे होईल. शॉर्टलिस्टिंग, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे योग्य उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत शंभर गुणांची असेल. निवडण्याचा अधिकार बँकेकडे असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: JOB Alert sbi sco recruitment 2021 here full bank jobs details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app