Lokmat Money > बिझनेस न्यूज > JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस

JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस

रिलायन्स इंडस्ट्रीज, वॉल्ट डिस्ने आणि बोधी ट्री यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओस्टारनं यावेळी मोठी कमाई केली आहे. पाहा काय आहे या मागचं कारण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:08 IST2025-04-26T12:07:24+5:302025-04-26T12:08:55+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज, वॉल्ट डिस्ने आणि बोधी ट्री यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओस्टारनं यावेळी मोठी कमाई केली आहे. पाहा काय आहे या मागचं कारण.

JioHotstar made huge profits became the second largest paid user base in the world | JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस

JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस

रिलायन्स इंडस्ट्रीज, वॉल्ट डिस्ने आणि बोधी ट्री यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओस्टारला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २२९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांसह हा अहवाल जारी करण्यात आला आहे, जो १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विलीनीकरणानंतर कंपनीचा पहिला आर्थिक अहवाल आहे. कंपनीचं उत्पन्न १०,००६ कोटी रुपये होतं. माध्यम समूहाचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ९,४९७ कोटी रुपये होता, ज्यात एबिटडा ७७४ कोटी रुपये आणि एबिटडा मार्जिन ७.७% होतं.

बनला दुसरा सर्वात मोठा पेड युजर प्लॅटफॉर्म

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी लाँच झालेल्या जिओहॉटस्टारनं केवळ पाच आठवड्यात १०० मिलियन पेड युजर्स आणि दहा आठवड्यात २८० पेड युजर्स तयार केलेत. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक वर्ग आहे. मार्च २०२५ मध्ये प्लॅटफॉर्मच्या मंथली अॅक्टिव्ह युजर्सची संख्या (MAU) ५०३ मिलियनवर पोहोचली.

इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?

क्रिकेटमुळे विक्रमी प्रेक्षकवर्ग मिळाला

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिओहॉटस्टारवर एकाच वेळी ६१.२ मिलियन लोकांनी पाहिला आणि भारतात डिजिटल स्पोर्ट्स स्ट्रीमिंगचा नवा विक्रम प्रस्थापित केला. सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ मध्ये १.४ बिलियन डिजिटल व्ह्यूज, २५३ मिलियन टीव्ही प्रेक्षक आणि एकूण ४९.६ बिलियन मिनिटांचा वॉच टाइम नोंदविला गेला. पहिल्या आठवड्यात जिओहॉटस्टारच्या व्ह्यूअरशिपमध्ये ३८ टक्के आणि कनेक्टेड टीव्हीच्या (सीटीव्ही) वॉच टाइममध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली.

टेलिव्हिजनवरही स्टार नेटवर्कचा दबदबा

जिओस्टारचं टेलिव्हिजन नेटवर्क भारताच्या एकूण टीव्ही एंटरटेन्मेंट व्ह्यूअरशिपच्या ३४% आहे, ज्यात ७६० मिलियन मंथली प्रेक्षकांचा समावेश आहे. स्टार प्लस हिंदी जीई सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे, १० पैकी ६ शो अव्वल स्थानावर आहेत. स्टार गोल्डवर प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' या चित्रपटाने ४१.२ दशलक्ष प्रेक्षक मिळवले होते.

नवा फॉर्मेट 'स्पार्क्स' लाँच

जिओहॉटस्टारनं डिजिटल क्रिएटर्ससाठी 'स्पार्क्स' हा नवा फॉर्मेट लाँच केला आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. महाशिवरात्रीच्या लाइव्ह स्ट्रीमिंगला ३९ मिलियन प्रेक्षक जोडले गेले, तर कोल्डप्लेची कॉन्सर्ट ८.३ दशलक्ष भारतीय युजर्सनं पाहिली.

Web Title: JioHotstar made huge profits became the second largest paid user base in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jioजिओ