Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?

'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?

Auto Sector lay off : ऑटो सेक्टरवर संध्या मंदीचे सावट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका मोठ्या कार कंपनीने २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:25 IST2025-05-13T10:25:00+5:302025-05-13T10:25:34+5:30

Auto Sector lay off : ऑटो सेक्टरवर संध्या मंदीचे सावट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका मोठ्या कार कंपनीने २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

japanese car maker nissan to cut twenty thousand jobs after sales drop | 'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?

'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?

Auto Sector lay off : अलिकडच्या काही महिन्यांत अनेक क्षेत्रावर मंदीच सावट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अ‍ॅपल, सॅमसंग आणि गुगलसारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नकार कपात केली. आता या यादीत एक प्रसिद्ध ऑटोकार उत्पादक कंपनीचे नावही जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी सुमारे २० हजार लोकांना कामावरुन काढणार आहे. यापूर्वी कंपनीने १० हजारांच्या आसपास कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. पण, ही संख्या आता दुप्पट केली आहे. जागतिक विक्रीत घट आणि तोट्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये कार विक्रीत घट
जपानची प्रसिद्ध ऑटो कार कंपनी निसानने हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये, निसानने सांगितले की अमेरिका आणि चीनमध्ये कार विक्रीत घट झाल्यामुळे त्यांचा पहिल्या सहामाहीतील नफा ९४% ने कमी झाला आहे. यामुळे ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील. जपानच्या प्रसारक NHK नुसार, आता कंपनीने २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, जे निसानच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के आहे.

जपानी कंपनी २०,००० लोकांना कामावरून काढणार
जपानी कार उत्पादक कंपनी निसानला गेल्या आर्थिक वर्षात त्यांना ७००-७५० अब्ज येन (४.७४ ते ५.०८ अब्ज डॉलर्स) नुकसान झाले आहे. एका अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की निसानच्या वतीने जपानमध्ये प्रशासकीय कामात गुंतलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना लवकर निवृत्ती दिली जाऊ शकते. जर असे झाले तर, १८ वर्षांमध्ये कंपनीची ही पहिलीच निवृत्ती योजना असेल. या अहवालाबाबत निसानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

वाचा - अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?

भारतीय ऑटो सेक्टरमध्ये मंदी?
टाटा, महिंद्रा सारख्या भारतीय ऑटो कार कंपन्यांवरही सध्या मंदिचे सावट दिसत आहे. टाटा मोटर्सचे शेअर अनेक दिवसांपासून घसरत होते. मागणी घटल्याने शेअर्सही घसरत आहेत. परिस्थिती पूर्णपदावर आली नाही तर आपल्याकडेही नोकर कपातीचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
 

Web Title: japanese car maker nissan to cut twenty thousand jobs after sales drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.