Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?

पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?

Share Market : पुढील आठवड्यात, दोनचार नाही तर १० कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करणार आहेत. याचा अर्थ असा की १० कंपन्यांचे आयपीओ दुय्यम बाजारात सूचीबद्ध होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:38 IST2025-06-01T12:21:16+5:302025-06-01T12:38:54+5:30

Share Market : पुढील आठवड्यात, दोनचार नाही तर १० कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करणार आहेत. याचा अर्थ असा की १० कंपन्यांचे आयपीओ दुय्यम बाजारात सूचीबद्ध होतील.

investors will be showered with money 10 companies are going to debut in the stock market | पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?

पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?

Share Market : पुढील आठवड्यात शेअर बाजारात कोणताही मोठा किंवा छोटा नवीन आयपीओ (IPO) येणार नसला तरी, दुय्यम बाजारात (Secondary Market) मात्र जबरदस्त हालचाल दिसून येणार आहे! आकडेवारीनुसार, येत्या आठवड्यात तब्बल १० कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहेत. याचा अर्थ, गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांत नवीन आयपीओ बाजारात आले असले तरी, आता त्यांचे लिस्टिंग होणार असल्याने गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सूचीबद्ध होणाऱ्या कंपन्यांमध्ये 'लीला हॉटेल्स' हे एक मोठे आणि महत्त्वाचे नाव मानले जाते. आता या कंपन्यांमध्ये लिस्टिंगच्या दिवशी कशी कामगिरी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पुढील आठवड्यात लिस्ट होणाऱ्या कंपन्या (२ जून ते ६ जून)
येत्या आठवड्यात शेअर बाजारात पदार्पण करणाऱ्या प्रमुख कंपन्या आणि त्यांच्या लिस्टिंगच्या संभाव्य तारखा खालीलप्रमाणे.

लीला हॉटेल्स आयपीओ:

  • लिस्टिंग तारीख: २ जून २०२५
  • जीएमपी (GMP): ४३५ रुपये (याचा अर्थ शेअर जास्त किमतीत लिस्ट होण्याची शक्यता)
  • हा आयपीओ २६ ते २८ मे दरम्यान खुला होता.

एजिस व्होपॅक टर्मिनल्स आयपीओ (Aegis Vopak Terminals IPO)

  • लिस्टिंग तारीख: २ जून २०२५
  • जीएमपी (GMP): २३५ रुपये
  • हा आयपीओ २६ ते २८ मे दरम्यान खुला होता.

ब्लू वॉटर लॉजिस्टिक्स आयपीओ (Blue Water Logistics IPO)

  • लिस्टिंग तारीख: ३ जून २०२५
  • जीएमपी (GMP): १३५ रुपये
  • हा आयपीओ २७ ते २९ मे दरम्यान खुला होता.

प्रोस्टारम इन्फो सिस्टम्स आयपीओ (Prostaram Info Systems IPO)

  • लिस्टिंग तारीख: ३ जून २०२५
  • जीएमपी (GMP): १०५ रुपये
  • हा आयपीओ २७ ते २९ मे दरम्यान खुला होता.

निकिता पेपर्स आयपीओ (Nikita Papers IPO)

  • लिस्टिंग तारीख: ३ जून २०२५
  • जीएमपी (GMP): १०४ रुपये
  • हा आयपीओ २७ ते २९ मे दरम्यान खुला होता.

एस्टोनिया लॅब्स आयपीओ (Estonia Labs IPO)

  • लिस्टिंग तारीख: ३ जून २०२५
  • जीएमपी (GMP): १३५ रुपये
  • हा आयपीओ २७ ते २९ मे दरम्यान खुला होता.

स्कोडा ट्यूब्स आयपीओ (Skoda Tubes IPO)

  • लिस्टिंग तारीख: ४ जून २०२५
  • जीएमपी (GMP): १४० रुपये
  • हा आयपीओ २८ ते ३० मे दरम्यान खुला होता.

नेपच्यून पेट्रोकेमिकल्स आयपीओ (Neptune Petrochemicals IPO)

  • लिस्टिंग तारीख: ४ जून २०२५
  • जीएमपी (GMP): १२२ रुपये
  • हा आयपीओ २८ ते ३० मे दरम्यान खुला होता.

एनआर वंदना टेक्सटाईल आयपीओ (NR Vandana Textile IPO)

  • लिस्टिंग तारीख: ४ जून २०२५
  • जीएमपी (GMP): ४५ रुपये
  • हा आयपीओ २८ ते ३० मे दरम्यान खुला होता.

३बी फिल्म्सचा आयपीओ (3B Films IPO)

  • लिस्टिंग तारीख: ६ जून २०२५
  • जीएमपी (GMP): ५० च्या किंमत पट्ट्यावर रु. ३ (३१ मे २०२५ पर्यंत)
  • हा आयपीओ ३० मे रोजी उघडला असून, ३ जून २०२५ रोजी बंद होईल.

वाचा - फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!

या सर्व लिस्टिंगमुळे शेअर बाजारात पुढील आठवड्यात मोठी उलाढाल आणि गुंतवणूकदारांना नफा कमावण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: investors will be showered with money 10 companies are going to debut in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.