Lokmat Money >विमा > Maha Kumbh ला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष इन्शुरन्स स्कीम, केवळ ₹५९ रुपये देऊन मिळेल 'इतकं' कव्हरेज

Maha Kumbh ला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष इन्शुरन्स स्कीम, केवळ ₹५९ रुपये देऊन मिळेल 'इतकं' कव्हरेज

यंदा हा योगायोग १४४ वर्षांनंतर तयार होत आहे, अशा परिस्थितीत प्रयागराजमध्ये प्रचंड भाविक येत आहेत. हा महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणारे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:28 IST2025-01-17T14:28:35+5:302025-01-17T14:28:35+5:30

यंदा हा योगायोग १४४ वर्षांनंतर तयार होत आहे, अशा परिस्थितीत प्रयागराजमध्ये प्रचंड भाविक येत आहेत. हा महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणारे. 

Special insurance scheme for devotees going to Maha Kumbh get lot of coverage by paying just Rs 59 | Maha Kumbh ला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष इन्शुरन्स स्कीम, केवळ ₹५९ रुपये देऊन मिळेल 'इतकं' कव्हरेज

Maha Kumbh ला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष इन्शुरन्स स्कीम, केवळ ₹५९ रुपये देऊन मिळेल 'इतकं' कव्हरेज

Maha Kumbh Prayagraj : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभाचं आयोजन करण्यात आलंय. याला पूर्ण महाकुंभ मेळा २०२५  (Maha Kumbh Mela 2025) असं म्हटलं जात आहे. पूर्ण महाकुंभ ही एक दुर्मिळ घटना आहे, जी १२ पूर्ण कुंभानंतर म्हणजे १४४ वर्षांनंतर येते. यंदा हा योगायोग १४४ वर्षांनंतर तयार होत आहे, अशा परिस्थितीत प्रयागराजमध्ये प्रचंड भाविक येत आहेत. हा महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणारे. 

अशा परिस्थितीत फोनपेनं प्रयागराजला जाणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी एक विशेष विमा योजना सुरू केली आहे, ज्याला महाकुंभ मेळा सुरक्षा (Maha Kumbh Mela Suraksha) असं नाव देण्यात आलं आहे. हा विमा तुम्ही फक्त ५९ रुपयांत खरेदी करू शकता. महाकुंभाच्या काळात प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची आरोग्याची आणीबाणी, अपघात किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा हाताळण्यासाठी हा विमा उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊ या विमा योजनेत कोणते कव्हरेज मिळणार आहे.

दोन प्रकारचा इन्शुरन्स

फोनपेनं दोन प्रकारचा इन्शुरन्स कव्हर सादर केलाय. एक रेल्वे किंवा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि दुसरा विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी. प्रयागराजला रेल्वे किंवा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा विमा केवळ ५९ रुपयांत खरेदी करता येणार आहे, तर देशांतर्गत विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा विमा ९९ रुपयांत मिळणार आहे.

याचा समावेश

यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, वैयक्तिक अपघात कव्हर, डॉक्टरांचा सल्ला, चेक-इन बॅगेज गमावल्याची भरपाई, कनेक्टिंग फ्लाइट्स चुकणं, ट्रिप रद्द होणं यांचा समावेश असेल. हा विमा १ वर्ष ते ७० वर्षे वयोगटातील लोकांसाठी खरेदी केला जाऊ शकतो. जर तुम्हाला ते खरेदी करायचं असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी तो विकत घ्यावा लागेल. प्रवासादरम्यान, प्रयागराजमध्ये मुक्काम आणि प्रयागराजहून परतताना तुम्हाला विमा संरक्षण मिळेल.

कसा खरेदी करता येईल?

एकदा विमा विकत घेतल्यानंतर तो रद्द करता येत नाही. फोनपेच्या अॅपवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला हा विमा खरेदी करायचा असेल तर २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फोनपे अॅपवर तो खरेदी करू शकता.

Web Title: Special insurance scheme for devotees going to Maha Kumbh get lot of coverage by paying just Rs 59

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.