PMJJBY : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य विमा आणि जीवन विमा असणे फार आवश्यक झाले आहे. मात्र, अनेकांना यांचे हप्ते परवडत नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात. पण, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, केंद्र सरकारच्या एका योजनेत तुम्ही ४३६ रुपयांमध्ये हा विमा खरेदी करू शकता. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) केंद्र सरकारद्वारे चालवली जात आहे. ही योजना २०२५ मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत, ४३६ रुपयांच्या प्रीमियमवर २ लाख रुपयांचे कव्हर प्रदान केले जाते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत, कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाते. ही पॉलिसी तुम्ही बँका आणि पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. ही पॉलिसी १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे
PMJJBY १८-५० वर्षे वयोगटातील सर्व व्यक्तींना २ लाख रुपयांचे एक वर्षाचे जीवन संरक्षण देते. या कव्हरमध्ये कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा समावेश होतो.
ग्राहकांना वर्षाला ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागतो, जो त्यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून ऑटो-डेबिट होतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता
१८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती ज्याचे बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते आहे, ती या पॉलिसीसाठी अर्ज करू शकते. ही पॉलिसी वयाच्या ५० वर्षापूर्वी खरेदी करून, विमाधारक नियमित प्रीमियम भरून ही पॉलिसी ५५ वर्षे सुरू ठेवू शकतो.
अर्ज प्रक्रिया
PMJJBY योजनेसाठी अर्ज सबमिट करण्यासाठी, व्यक्ती एकतर बँकेच्या शाखेत/बीसी पॉइंटला भेट देऊ शकतात किंवा बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात. पोस्ट ऑफिस बचत बँक खातेधारकांना अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिसला जावे लागेल. पीएमजेजेबीवाय योजनेचा प्रीमियम प्रत्येक वर्षी खातेदाराच्या एक-वेळच्या ऑर्डरनुसार ग्राहकांच्या बँक खात्यातून आपोआप कापला जातो.