Lokmat Money >विमा > गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?

गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?

Car Insurance Premium: लवकरच वाहनांचा विमा खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात. काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 09:59 IST2025-06-10T09:58:08+5:302025-06-10T09:59:14+5:30

Car Insurance Premium: लवकरच वाहनांचा विमा खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात. काय आहे यामागचं कारण?

owning a car will now become more expensive preparations for a big increase in third party insurance how much will the cost increase | गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?

गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?

Car Insurance Premium: लवकरच वाहनांचा विमा खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियानं (IRDAI) मोटर थर्ड पार्टी (TP) विमा हप्त्यात सरासरी १८ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. मात्र, काही प्रकारच्या वाहनांमध्ये ही वाढ २० टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंत असू शकते. या प्रस्तावाचा सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आढावा घेतला जात असून, येत्या दोन ते तीन आठवड्यांत हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

उद्योग जगतातील एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांहून अधिक काळाच्या स्थगितीनंतर आयआरडीएआयनं हा प्रस्ताव अशा वेळी ठेवला आहे जेव्हा व्यापक सामान्य विमा उद्योग वाढते दावे आणि निश्चित किंमतीच्या रचनेचा सामना करत आहे. वाहनांची वाढती डेन्सिटी, महागाईचा दबाव आणि नुकसान भरपाईशी ताळमेळ साधण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचं भागधारकांचं मत आहे. मात्र, मंत्रालयाच्या मान्यतेनंतर लोकसहमतीसाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सूचना घेणं, आढावा घेणं अशा इतर प्रक्रिया केल्या जातील, त्यानंतरच या बदलांची अंमलबजावणी केली जाईल.

बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही

काय आहे मोटर थर्ड पार्टी इन्शुरन्स?

मोटार वाहन कायद्यानुसार मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक आहे. हा विमा आपल्या वाहनाला अपघात झाल्यास तिसऱ्या व्यक्तीला (जसे की पादचारी, दुसरा ड्रायव्हर किंवा त्यांची मालमत्ता) झालेल्या नुकसानीची भरपाई करतो. हे आपलं किंवा आपल्या वाहनाचं नुकसान कव्हर करत नाही, तर इतरांना झालेल्या नुकसानीपासून संरक्षण देतं. थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणं बेकायदेशीर आहे आणि यामुळे दंड किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामुळे कारचालकाचं आर्थिक बोजापासून संरक्षण होतं, तुमच्या चुकीमुळे दुसऱ्या कुणाचं नुकसान झाले तर त्याची भरपाई विमा कंपनी करते. यात तिसऱ्या व्यक्तीला इजा किंवा मृत्यूची भरपाई आणि तिसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या (जसे की दुसरे वाहन, दुकान किंवा घर) नुकसानीची भरपाई समाविष्ट आहे.

वाढीनंतर किती प्रीमियम?

विमा तज्ज्ञांच्या मते, इंजिनच्या क्षमतेनुसार दुचाकींचा प्रीमियम वाढणार आहे. उदाहरणार्थ, ३५० सीसीच्या दुचाकीचा मोटर थर्ड पार्टी (टीपी) विमा हप्ता सध्या २८०० रुपयांच्या आसपास आहे, त्यामुळे १८ टक्के वाढीनंतर तो ३३०० रुपयांच्या आसपास असेल. त्यासाठी वर्षाला सुमारे ५०० रुपये अधिक खर्च करावे लागतील.

तर चारचाकी वाहनांमध्ये १५०० सीसीच्या कारसाठी ७,९०० रुपयांचा प्रीमियम भरावा लागला तर १८% वाढीनंतर प्रीमियम जवळपास ९८७० रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला जवळपास १४०० रुपये जास्त खर्च करावे लागतील. यानुसार १००० सीसी ते १५०० सीसी आणि १००० सीसीपर्यंतच्या कारच्या विमा हप्त्यात १८ टक्के वाढ होणार आहे.

Web Title: owning a car will now become more expensive preparations for a big increase in third party insurance how much will the cost increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.