Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >विमा > जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 

जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 

भारतातील जीवन विमा क्षेत्राने सलग दुसऱ्या महिन्यात दोन अंकी वाढ कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्यवसायाचा हप्ता (प्रीमियम) वार्षिक आधारावर १२.१ टक्के वाढलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:11 IST2025-11-12T16:11:52+5:302025-11-12T16:11:52+5:30

भारतातील जीवन विमा क्षेत्राने सलग दुसऱ्या महिन्यात दोन अंकी वाढ कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्यवसायाचा हप्ता (प्रीमियम) वार्षिक आधारावर १२.१ टक्के वाढलाय.

Life and health insurance coverage increased after GST was abolished premiums increased to Rs 34007 crore | जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 

जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 

भारतातील जीवन विमा क्षेत्राने सलग दुसऱ्या महिन्यात दोन अंकी वाढ कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्यवसायाचा हप्ता (प्रीमियम) वार्षिक आधारावर १२.१ टक्के वाढून ३४,००७ कोटी रुपये झाला. 

‘केअरएज रेटिंग्ज’नं अहवालात ही माहिती दिली आहे. ही वृद्धी ऑगस्टमधील ५.२ टक्के घसरणीनंतरची मोठी सुधारणा आहे. वैयक्तिक नॉन-सिंगल पॉलिसींच्या प्रीमियममध्ये झालेली लक्षणीय वाढ ही आरोग्यदायी गुंतवणुकीचे द्योतक आहे.

पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ

ही वाढ का झाली?

ही वाढ प्रामुख्याने वैयक्तिक विभागातील, विशेषतः नॉन-सिंगल प्रीमियम पॉलिसींच्या मजबूत विक्रीमुळे झाली आहे. त्यामुळे नियमित गुंतवणुकीची मागणी वाढत असल्याचं दिसून येत आहे. वैयक्तिक जीवन विमा उत्पादनांवरील जीएसटी कपातीमुळेही विमा क्षेत्राची वाढती गती टिकून आहे.

एलआयसीनं आपलं स्थान कायम राखलं

भारतीय आयुर्विमा विमा महामंडळान (एलआयसी) आपलं अग्रस्थान कायम ठेवलं असून, खासगी कंपन्यांनीही दोन अंकी वाढ नोंदवली. जीवन व आरोग्य विम्यावर जीएसटी रद्द झाल्यानं विक्रीला मोठा वेग आला आहे. उद्योग आता पुन्हा दोन अंकी वाढीकडे परतला असून, मागणी सुधारत आहे. विमा उद्योग अनुकूल नियम, उत्पादनांची ऑफर, डिजिटलसह मजबूत वितरण जाळ्याच्या माध्यमातून ही सकारात्मक वाढ कायम ठेवेल.

Web Title : जीएसटी कटौती के बाद जीवन, स्वास्थ्य बीमा में उछाल; प्रीमियम बढ़ा।

Web Summary : भारत के जीवन बीमा क्षेत्र में दो अंकों की वृद्धि देखी गई। अक्टूबर में प्रीमियम आय 12.1% बढ़कर ₹34,007 करोड़ हो गई, जो गैर-सिंगल प्रीमियम पॉलिसी और जीएसटी कटौती से प्रेरित है, जिससे मांग बढ़ी है। एलआईसी का नेतृत्व बरकरार; निजी कंपनियों में भी वृद्धि देखी गई।

Web Title : Life, health insurance surge after GST cut; premium up.

Web Summary : India's life insurance sector sees double-digit growth. Premium income rose 12.1% to ₹34,007 crore in October, driven by non-single premium policies and GST reduction, boosting demand. LIC maintains lead; private firms also see growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा