Lokmat Money >विमा > मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींना तुम्ही एकच समजता का? मग जाणून घ्या यातला फरक

मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींना तुम्ही एकच समजता का? मग जाणून घ्या यातला फरक

कोरोनाच्या काळानं लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये मेडिकल सिक्युरिटी सामिल करण्याचा धडा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:32 PM2023-11-25T15:32:14+5:302023-11-25T15:32:24+5:30

कोरोनाच्या काळानं लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये मेडिकल सिक्युरिटी सामिल करण्याचा धडा दिला आहे.

Do you think both Mediclaim and Health Insurance are same Then know the difference | मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींना तुम्ही एकच समजता का? मग जाणून घ्या यातला फरक

मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हींना तुम्ही एकच समजता का? मग जाणून घ्या यातला फरक

Mediclaim vs Health Insurance : कोरोनाच्या काळानं लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये मेडिकल सिक्युरिटी सामिल करण्याचा धडा दिला आहे. कोणाला कधी आणि कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. यासाठी अगोदर तयारी केली नाही तर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. यामुळेच आता लोक नक्कीच आरोग्य विमा खरेदी करतात. परंतु बरेच लोक हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम एकच असल्याचं मानतात आणि या गोंधळामुळे ते हेल्थ इन्शुरन्सऐवजी मेडिक्लेम घेतात. जर तुम्हीही हीच चूक करत असाल तर आजच ही चूक नक्की सुधारा आणि त्यांच्यातील फरक जाणून घ्या.

काय असतो हेल्थ इन्शुरन्स
हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करतो. यामध्ये रूग्णालयात दाखल होण्याआधीचे आणि नंतरचे खर्च, डेकेअर, ओपीडी खर्च इत्यादींचाही समावेश होतो. पॉलिसीनुसार हा संपूर्ण खर्च कंपनी उचलते. आरोग्य विम्यामध्ये, तुम्हाला गंभीर आजार, मातृत्व लाभ आणि सीरिअस इलनेस यांसारखे अनेक प्रकारचे अतिरिक्त कव्हर मिळू शकतात. विमा वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया दोन्ही कव्हरेज प्रदान करतो. आरोग्य विमा योजनेत फ्लेक्सिबिलिटी असते आणि वैयक्तिक गरजेनुसार मॅनेज केल्या जाऊ शकतात. हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असते.

मेडिक्लेम म्हणजे काय?
मेडिक्लेम ही एक विमा पॉलिसी आहे ज्यामध्ये तुम्हाला रुग्णालयात दाखल केल्यावरच संरक्षण मिळते. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त कव्हर अॅड-ऑन घेण्याची सुविधा मिळत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, हॉस्पिटलायझेशनचा कमाल खर्च ५ लाख रुपयांपर्यंत आहे. जास्तीत जास्त संरक्षण प्रदान केलेल्या विम्यावर अवलंबून असते. आरोग्य विम्याच्या तुलनेत यात कमी फ्लेक्सिबलिटी आहे. तुमच्याकडे मेडिक्लेम असल्यास, तुम्ही तुमची बिले विमा कंपनीकडे खर्चाची भरपाई करण्यासाठी सबमिट करू शकता किंवा तुम्ही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कॅशलेस पर्याय निवडू शकता.

काय निवडावं?
मेडिक्लेमचं कव्हरेज कमी असल्यानं ते हेल्थ इन्शुरन्सच्या तुलनेत स्वस्त असतं. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स निवडला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स घेताना, विविध कंपन्यांनी दिलेले कव्हरेज, सेवा, फायदे आणि प्रीमियम यांची तुलना करणं खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिक विम्याच्या गरजा भिन्न असू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजा पूर्ण करणारा प्लॅन खर्च करावा.

Web Title: Do you think both Mediclaim and Health Insurance are same Then know the difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य