Indigo 4 Days International Sale Starts Today, Ticket Starting 3499 Rupees | खूशखबर! अवघ्या 3499 रुपयांत करा विदेशात हवाई सफर

खूशखबर! अवघ्या 3499 रुपयांत करा विदेशात हवाई सफर

ठळक मुद्देइंडिगो अब्रॉड सेलची ऑफर 18 फेब्रुवारीला लाँच63 डोमेस्टिक आणि 24 इंटरनॅशनलआंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये 2.5 लाख सीट आरक्षित

नवी दिल्ली : इंडिगो विमान कंपनीने आपल्यासाठी शानदार ऑफर आणली आहे. जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त 3499 पूर्ण होऊ शकणार आहे. इंडिगो अब्रॉड सेलची ऑफर 18 फेब्रुवारीला लाँच झाली आहे. तसेच, ही ऑफर 21 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तिकीट बुकिंग केल्यानंतर 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या दरम्यान प्रवास करता येणार आहे. 

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, या सेलमध्ये आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये 2.5 लाख सीट आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. इंडिगोच्या दररोज विविध ठिकाणाहून 1500 फ्लाइटचे उड्डाण होत असते. इंडिगोची सर्व्हिस 63 डोमेस्टिक आणि 24 इंटरनॅशनलसाठी उपलब्ध आहे. यामध्ये इंडिगोच्या 250 हून अधिक विमानांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी इंडिगोने विदेशात जाणाऱ्या उड्डाणांसाठीची dual-aisle Airbus 330 एअरक्राफ्ट उतरण्याची योजना रद्द केली आहे. एअरलाइन युरोप आणि लंडनच्या उड्डाणांसाठी single-aisle 321 XLR (एक्स्ट्रा लॉन्ग रेंज) विमानांचा वापर करण्याची शक्यता आहे. हे विमान 2023-24 मध्ये इंडिगोला मिळणार आहेत. इंडिगोच्या ताफ्यात ज्यावेळी हे विमान येईल, त्यावेळी भारत ते लंडन आणि पॅरिस यासारख्या युरोप शहरांच्या तिकीट दरात मोठी घट होईल. दरम्यान, यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

English summary :
IndiGo Offering Discounted Tickets at Just Rs 3,499 for International Flights

Web Title: Indigo 4 Days International Sale Starts Today, Ticket Starting 3499 Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.