lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुलाखतीशिवाय १० पासना मिळणार नोकरी, पोस्टात 3262 पदांसाठी निघाली भरती

मुलाखतीशिवाय १० पासना मिळणार नोकरी, पोस्टात 3262 पदांसाठी निघाली भरती

अर्ज करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:10 PM2020-08-12T15:10:25+5:302020-08-12T15:10:45+5:30

अर्ज करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

indian post gds bharti 2020 rajasthan vacancy 2020 how to apply | मुलाखतीशिवाय १० पासना मिळणार नोकरी, पोस्टात 3262 पदांसाठी निघाली भरती

मुलाखतीशिवाय १० पासना मिळणार नोकरी, पोस्टात 3262 पदांसाठी निघाली भरती

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. राजस्थान पोस्टल सर्कलमधील हजारो पदांवर ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. भारतीय टपाल विभाग (इंडिया पोस्ट) राजस्थान पोस्टल सर्कलमधील एकूण 3262 पदांवर उमेदवारांना नोक-या देण्यात येणार आहेत. त्याचा तपशील येथे देण्यात आला आहे. यासह अधिसूचनाही जाहीर  करण्यात आली आहे. 

पदांची माहिती
अनारक्षित - 1527 पदे
ओबीसी - 348 पदे
आर्थिक दुर्बल विभाग - 278 पदे
अनुसूचित जाती - 544 पदे
एससी- 544 पदे
एसटी - 468 पदे
दिव्यांग ए - 32 पदे
दिव्यांग बी - 23 पदे
दिव्यांग सी - 32 पदे
दिव्यांग डीई - 10 पदे
एकूण पदांची संख्या - 3262 पदे

अर्ज माहिती
इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 6 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2020 आहे. सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पुरुष उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकतो.

आवश्यक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून गणित, इंग्रजी व स्थानिक भाषेसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा - या पदांच्या निवडीसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे. आरक्षणाच्या नियमांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये शिथिल होण्याचा लाभही मिळेल.

निवड प्रक्रिया - या पदांवर पात्र उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.
 

Web Title: indian post gds bharti 2020 rajasthan vacancy 2020 how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.