Indian Deposits in Swiss Bank : स्विस बँकेने वार्षिक आकडेवारी जाहीर केली आहे, या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्विस बँकेत २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये भारतीयांनी जमा केलेले पैसे तिप्पट होऊन ३.५ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे ३७,६०० कोटी रुपये झाले आहेत. स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या पैशात मोठी वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली. २०२३ मध्ये ही रक्कम १.०४ अब्ज स्विस फ्रँक या चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली होती.
स्विस नॅशनल बँकेच्या अधिकृत आकडेवारीत स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या रक्कमेचा काळ्या पैशाचा उल्लेख नाही. स्वित्झर्लंड भारतीयांच्या पैशाला काळा पैसा मानत नाही. स्वित्झर्लंड करचुकवेगिरीविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देत असल्याचे सांगत आहे.
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, या काळात भारतीयांच्या ग्राहक खात्यातील रक्कम केवळ ११ टक्क्यांनी वाढून ३४.६ कोटी स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे ३,६७५ कोटी रुपये झाली आहे.
या वर्षी सर्वाधिक वाढ
२०२३ मध्ये भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशांमध्ये ७० टक्के घट झाली. तर २०२१ नंतर भारतीयांनी स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशांमध्ये सर्वाधिक वाढ झाली.
भारतीयांची एकूण संपत्ती १४ वर्षांच्या उच्चांकावर
२०२१ मध्ये स्विस बँकेत भारतीयांचे एकुण संपत्ती १४ वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली.
एसएनबीच्या आकडेवारीनुसार, २००६ मध्ये एकूण रक्कम सुमारे ६.५ अब्ज स्विस फ्रँक इतकी विक्रमी उच्चांकी होती. भारतीय ग्राहकांप्रती स्विस बँकांच्या एकूण देणग्यांच्या डेटामध्ये भारतीय ग्राहकांच्या स्विस बँकांमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या निधीचा समावेश आहे, यामध्ये व्यक्ती, बँका आणि कंपन्यांच्या ठेवींचा समावेश आहे.
यामध्ये भारतातील स्विस बँकांच्या शाखांचा तसेच ठेव नसलेल्या देणग्यांचा डेटाचा समावेश आहे. २०१८ पासून कर बाबींमध्ये स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यात माहितीची देवाण घेवाण होते. तसेत २०१८ पासून स्विस वित्तीय संस्थांमध्ये खाते असलेल्या सर्व भारतीय रहिवाशांची तपशीलवार आर्थिक माहिती सप्टेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदाच दिली होती. तेव्हापासून प्रत्येक वर्षी पैसे ठेवणाऱ्यांची माहिती दिली जाते.