India holds US $ 8 billion bond | भारताकडे अमेरिकेचे १६२.७ अब्ज डॉलर्सचे रोखे

भारताकडे अमेरिकेचे १६२.७ अब्ज डॉलर्सचे रोखे

नवी दिल्ली : भारताकडे या वर्षीच्या जूनअखेर अमेरिकन सरकारचे रोखे (सिक्युरिटीज) सहा अब्ज डॉलर्सने वाढून ते १६२.७ अब्ज डॉलर्स झाले आहेत. किमान एका वर्षात भारताने ही सर्वात मोठी पातळी गाठली आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जून, २०१९ अखेर हे रोखे (१.१२२ ट्रिलियन डॉलर्स) जास्त जपानकडे तर १.११२ ट्रिलियन डॉलर्सचे रोखे चीनकडे आहेत. ज्या प्रमुख देशांनी अमेरिकन सरकारचे हे रोखे बाळगले आहेत, त्यात भारताचा क्रमांक १३वा (१६२.७ ट्रिलियन डॉलर्स) आहे. गेल्या मे महिन्यात हे रोखे १५६.९ अब्ज डॉलर्स तर एप्रिल महिन्यात १५५.३ अब्ज डॉलर्सचे होते. जून महिन्यात भारताकडे असलेले हे रोखे एका वर्षातील सर्वात जास्त होते. जून, २०१८मध्ये ते १४७.३ अब्ज डॉलर्स होते.
जागतिक अर्थव्यवस्था व्यापार युद्ध, काही आश्वासक बाजारपेठांच्या घसरणींसह सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने लक्षणीय म्हणता येईल अशी रोख्यांत वाढ केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  India holds US $ 8 billion bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.