Lokmat Money >आयकर > इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत, पण ITR दाखल केल्यास त्यांनाही मिळतील 'हे' १० फायदे

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत, पण ITR दाखल केल्यास त्यांनाही मिळतील 'हे' १० फायदे

ITR filing Benefits for Non Taxpayers : अनेक लोकांना वाटतं की मी आयकराच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे मला कर भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, तुम्ही आयटीआर भरला तर तुम्हाला किमान १० फायदे निश्चित होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:07 IST2024-12-13T16:07:24+5:302024-12-13T16:07:24+5:30

ITR filing Benefits for Non Taxpayers : अनेक लोकांना वाटतं की मी आयकराच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे मला कर भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, तुम्ही आयटीआर भरला तर तुम्हाला किमान १० फायदे निश्चित होतात.

top 10 benefits of filing itr income tax return for non taxpayers | इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत, पण ITR दाखल केल्यास त्यांनाही मिळतील 'हे' १० फायदे

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत, पण ITR दाखल केल्यास त्यांनाही मिळतील 'हे' १० फायदे

ITR filing Benefits for Non Taxpayers : दरवर्षी जून महिन्यात सर्व भारतीयांना आयकर परतावा (ITR भरण्याचे आवाहन करण्यात येते. जे आयकराच्या कक्षेत येतात त्यांना तर आयटीआर भरणे बंधनकारक आहेच. मात्र, जे आयकर कक्षाच्या बाहेर येतात त्यांनीही आयटीआर भरणे आवश्यक आहे. कारण, भविष्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच आर्थिक सल्लागार आयकराचे दायित्व नसलेल्या लोकांनाही आयटीआर भरण्या सांगतात.

  1. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही स्रोतातून कमाई करत असाल, तर ITR भरणे तुमच्या उत्पन्नाचे अचूक दस्तऐवज तयार करते. हा पुरावा अनेक ठिकाणी उपयुक्त आहे.
  2. आयटीआर फाइलिंग तुमच्यासाठी मजबूत आर्थिक रेकॉर्ड तयार करते. भविष्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल किंवा कोणत्याही मोठ्या व्यवहारात सहभागी व्हायचे असेल, तर आयटीआर रेकॉर्ड तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
  3. तुम्हाला गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार लोन घ्यायचे असल्यास बँका तुमच्या उत्पन्नाचा विश्वसनीय पुरावा म्हणून ITR मानतात. जरी तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत नसला तरी, ITR भरल्याने कर्ज मंजूर करणे सोपे होते.
  4. जर तुमच्या उत्पन्नावर आधीच कर कापला गेला असेल आणि तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल, तर ITR दाखल करून तुम्ही त्या अतिरिक्त कराच्या परताव्याची मागणी करू शकता. आयटीआर दाखल केल्यानंतरच हे शक्य आहे.
  5. जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करत असाल तर आयटीआर फाइलिंग हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तुमची आर्थिक स्थिती काय आहे हे ते दाखवते. जे स्वत: कमावत नाहीत ते त्यांच्या आई वडील किंवा पालकांच्या आयटीआरची प्रत देऊ शकतात. हे तुम्हाला व्हिसा मंजुरीसाठी मदत करते.
  6. आयटीआर दाखल केल्याने, तुमच्या उत्पन्नाचा रेकॉर्ड कर विभागाकडे सुरक्षित राहतो. याद्वारे तुम्ही भविष्यात कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद किंवा तपास टाळू शकता.
  7. जर तुम्ही फ्रीलान्स काम करत असाल, एखादा छोटासा व्यवसाय चालवत असाल किंवा उत्पन्नाच्या अनियमित स्रोतांमधून पैसे कमावत असाल, तर ITR फाइलिंग तुमचे उत्पन्न प्रमाणित करते. आयटीआर घर भाड्याने देणे, गुंतवणूक करणे आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त आहे.
  8. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही सरकारी विभागाकडून करार मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी आयटीआर फाइल करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या ५ वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.
  9. अनेक सरकारी योजनांमध्ये अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा विचारला जातो. ITR दाखल केल्याने तुम्हाला या योजनांचा लाभ घेणे सोपे जाते.
  10. तुम्ही ५० लाख रुपये किंवा १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी ITR पावती दाखवावी लागते. एलआयसीमध्ये, विशेषत: तुम्ही ५० लाख रुपये किंवा त्याहून अधिक मुदतीची पॉलिसी घेतल्यास, तुमच्याकडे आयटीआर कागदपत्रांची मागणी केली जाते.

Web Title: top 10 benefits of filing itr income tax return for non taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.