Lokmat Money >आयकर > आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड

आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड

new income tax norms : १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे या वर्षीची काही आर्थिक कामे पूर्ण करण्याची आजचा शेवटचा दिवस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:50 IST2025-03-31T10:08:23+5:302025-03-31T10:50:46+5:30

new income tax norms : १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे या वर्षीची काही आर्थिक कामे पूर्ण करण्याची आजचा शेवटचा दिवस आहे.

new income tax norms gst changes upi payment money rule changes from april 1 2025 | आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड

आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड

new income tax norms : उद्या १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२४-२५ शी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण केली असतील तर चांगली गोष्ट आहे. पण, जर एखादं काम राहिलं असेल तर ते पूर्ण करण्याची आज तुमची शेवटची संधी आहे. कारण आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ मार्च आहे. ही संधी हुकली तर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. या कामांमध्ये कर जमा करणे, प्रलंबित अपडेटेड ITR भरणे आणि इतर अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न
तुमचा अपडेटेड आयटीआर दाखल करण्याची आज शेवटची संधी आहे.. अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा आयटीआर ३१ मार्च २०२५ पर्यंत भरू शकता. या करदात्यांनी या वर्षाचा आयकर परतावा भरला नसेल त्यांच्यासाठी ही मुदत आहे. ज्यांना आर्थिक वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या मागील ITR फाइलिंगमध्ये कोणतीही तफावत आढळली आहे, ते ITR-U मध्ये सुधारणा करू शकतात. तसेच, ज्यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नावर कमी कर भरला आहे ते देखील अपडेटेड आयटीआर दाखल करू शकतात. आजची तारीख हुकली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

कलम ८०C अंतर्गत कर सवलतीचा लाभ
ईएलएसएस म्युच्युअल फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), आणि कर-बचत मुदत ठेवी (FD) यासह इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आर्थिक वर्षासाठी १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट मिळवू शकता.

दंड टाळण्यासाठी कर भरा
मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजे ३१ मार्च आहे. जर एखाद्याचे एकूण कर दायित्व (स्रोत किंवा TDS वरून कापलेले कर वगळून) १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ३१ मार्चपर्यंत आगाऊ कर भरणे चांगले होईल. अन्यथा, तुम्ही तसे न केल्यास तुम्हाला व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची संधी
जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर आजच हे काम पूर्ण करा. कारण, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते, ज्यामुळे बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात.

वाचा - १ एप्रिलपासून बदलताहेत Income Tax चे नियम, मध्यमवर्गीयांसाठी मोठी खुशखबर

कलम ८०D अंतर्गत आरोग्य विम्यावरील कर लाभ
आयकर कलम ८०D अंतर्गत करदाता स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा प्रीमियम पेमेंटवर ७५,००० पर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतो. तुम्हीही या वर्गात असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
 

Web Title: new income tax norms gst changes upi payment money rule changes from april 1 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.