Lokmat Money >आयकर > ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

ITR Deadline Extension: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. मात्र, पोर्टलच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले करदाते सतत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:58 IST2025-09-14T15:58:00+5:302025-09-14T15:58:37+5:30

ITR Deadline Extension: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. मात्र, पोर्टलच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले करदाते सतत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत आहेत.

ITR Filing Deadline Taxpayers Demand Extension as Portal Faces Glitches | ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

ITR Deadline Extension : आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आता केवळ एक दिवसाची मुदत शिल्लक आहे. पूर्वी ३१ जुलै असलेली अंतिम मुदत सरकारने १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. मात्र, आता ही वाढीव मुदत संपत आल्याने करदाते, सनदी लेखापाल (CA) आणि विविध संघटनांकडून मुदतवाढीची जोरदार मागणी केली जात आहे. कारण, पोर्टल स्लो झाल्याची अनेक तक्रारी लोक सोशल मीडियावर करत आहेत.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर हजारो लोक #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग वापरून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक वापरकर्ते स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ शेअर करून दाखवत आहेत की, आयकर पोर्टल मंदावले आहे, वारंवार एरर येत आहे आणि लॉग-इन करणेही शक्य होत नाही.

सोशल मीडियावर #ExtendDueDate ट्रेंडमध्ये
एका वापरकर्त्याने लिहिले, “आयकर पोर्टलची स्थिती खूपच खराब आहे. ते स्लो झालं आहे, वारंवार अडकते आणि कामच करत नाही. करदाते आणि व्यावसायिकांची अवस्था दयनीय झाली आहे. सरकारने त्वरित अंतिम मुदत वाढवावी.”

एका करदात्याने आपला संताप व्यक्त करत लिहिले, “१५ वेळा प्रयत्न केला... प्रत्येक वेळी हाच मेसेज येतोय – ‘Sorry! You do not have access to page. You can go back to dashboard.”

याचसोबत, अनेकांनी उपरोधात्मक कमेंट्सही केल्या आहेत. एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “फॉर्म उशिरा, युटिलिटीज उशिरा, पोर्टल अस्थिर… पण पेनल्टी? ती मात्र नेहमी वेळेवर.”

वाचा - गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय

संघटनांकडूनही सरकारकडे विनंती
करदात्यांच्या या मागणीला विविध संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. फायनान्शिअल इंडस्ट्री एम्प्लॉईज असोसिएशनने अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला पत्र लिहून मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, यावर्षी आलेल्या पुरामुळे, पोर्टलवरील तांत्रिक बिघाडांमुळे आणि अनुपालनाचा वाढलेला बोजा यामुळे करदात्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत १६ हून अधिक संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

Web Title: ITR Filing Deadline Taxpayers Demand Extension as Portal Faces Glitches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.