Lokmat Money >आयकर > ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR Filing Last Date: प्रत्येक करदात्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करणे अनिवार्य आहे. हे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करते आणि कर परतावा देखील देऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:44 IST2025-08-29T14:25:25+5:302025-08-29T14:44:54+5:30

ITR Filing Last Date: प्रत्येक करदात्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करणे अनिवार्य आहे. हे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करते आणि कर परतावा देखील देऊ शकते.

ITR Filing Deadline Extended to September 15, 2025 Avoid Penalty and Interest | ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR Filing Last Date : दरवर्षी जेव्हा आयकर रिटर्न (ITR) भरण्याची वेळ येते, तेव्हा अनेकजण आज भरू, उद्या करू असं म्हणत शेवटच्या दिवसांपर्यंत टाळत राहतात. त्यामुळे शेवटच्या क्षणी धावपळ होते आणि वेळेत रिटर्न दाखल होईल की नाही, याची चिंता असते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

या वर्षी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख ३१ जुलै होती, पण सरकारने करदात्यांना अधिक वेळ देण्यासाठी ही मुदत वाढवली आहे. ही तारीख अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही, जसे की बहुतांश पगारदार कर्मचारी. ज्यांच्या व्यवसाय किंवा आर्थिक नोंदींचे ऑडिट होते, त्यांच्यासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे.

१५ सप्टेंबरनंतरही तुम्ही आयकर रिटर्न भरू शकता, पण त्यानंतर विलंब शुल्क (पेनल्टी) लागू होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये नोटीस देखील येऊ शकते. म्हणूनच, कोणत्याही अडचणीपासून वाचण्यासाठी मुदतीपूर्वीच आपला ITR दाखल करणे चांगले राहील.

किती लागतो दंड?

  • जर तुम्ही आयकर रिटर्न (ITR) १५ सप्टेंबर २०२५ च्या अंतिम मुदतीनंतर दाखल केला, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. हा दंड तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतो.
  • जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर १,००० रुपये दंड लागेल.
  • ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ५,००० रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
  • याशिवाय, थकित कर रकमेवर दर महिन्याला १% व्याज देखील द्यावे लागेल. त्यामुळे, दंड आणि व्याजापासून वाचण्यासाठी वेळेत ITR दाखल करणे महत्त्वाचे आहे.

ITR भरण्याचे फायदे
आयकर रिटर्न दाखल करणे प्रत्येक करदात्यासाठी आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात.
कायदेशीर जबाबदारी पूर्ण होते: ITR भरल्याने तुमची कायदेशीर जबाबदारी पूर्ण होते आणि तुम्ही कोणत्याही करविषयक कायदेशीर प्रकरणात अडकत नाही.

वाचा - जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
टॅक्स रिफंड मिळतो: जर तुम्ही जास्त टॅक्स भरला असेल, तर त्याचा परतावा (रिफंड) तुम्हाला ITR द्वारे परत मिळतो.
कर्ज आणि व्हिसासाठी उपयुक्त: ITR दाखल केल्याची नोंद तुम्हाला कर्ज घेण्यासाठी किंवा व्हिसा अर्जासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये आवश्यक असते.

Web Title: ITR Filing Deadline Extended to September 15, 2025 Avoid Penalty and Interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.