ITR Deadline : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी प्राप्तीकर परतावा भरण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली होती. परंतु, आता ही मुदत पूर्णपणे संपली आहे. पण, काही कारणास्तव तुमची आयटीआर भरण्याची तारीख चुकली असेल. तर तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत २०२५ पर्यंत आयटीआर भरण्याची संधी आहे. पण, आता जर तुम्ही ITR भरला नाही, तर तुम्हाला दंड आणि व्याज दोन्ही भरावे लागेल. ITR भरण्याचा पर्याय पूर्णपणे संपलेला नसला तरी, तो विलंबित रिटर्न म्हणून गणला जातो.
बिलिटेड रिटर्नची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
आयटीआर फॉर्म्समध्ये मोठे बदल आणि पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत दोनदा वाढवण्यात आली होती. पण, आता १६ सप्टेंबरची रात्र ११:५९ वाजता ITR भरण्याची वेळ संपली आहे.
पुढील मुदत: तुम्ही आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बिलिटेड रिटर्न दाखल करू शकता.
३१ डिसेंबरनंतर: ही मुदतही चुकल्यास, त्यानंतर तुम्हाला 'अद्ययावत रिटर्न' (ITR-U) दाखल करावा लागेल, जो आणखी महागडा ठरेल.
दंड आणि व्याजाचा कसा बसेल फटका?
विलंबित रिटर्न भरल्यास करदात्याला दोन प्रमुख दंडात्मक तरतुदींचा सामना करावा लागतो.
वार्षिक उत्पन्न | विलंब शुल्क (रुपये) |
५ लाख किंवा त्याहून अधिक | ५,००० |
५ लाखांपेक्षा कमी | १,००० |
थकीत करावर व्याज - कलम 234A
जर तुम्ही कराची रक्कम अंतिम मुदतीत भरली नसेल, तर थकीत कराच्या रकमेवर दरमहा १ टक्के व्याज भरावे लागेल.
उदाहरणार्थ: तुमचा १०,००० रुपये कर बाकी असेल आणि तुम्ही एक महिना उशीर केला, तर तुम्हाला १०० रुपये अतिरिक्त व्याज भरावे लागेल. (१६ सप्टेंबरनंतरचा एक दिवस उशीर सुद्धा पूर्ण महिना गणला जातो.)
लेट फाइलिंगमुळे होणारे सर्वात मोठे नुकसान
केवळ दंड आणि व्याजच नव्हे, तर ITR उशिरा भरल्याने करदात्याचे मोठे आर्थिक नुकसान होते.
जुनी करप्रणालीचा पर्याय नाही : नवीन करप्रणाली आता डिफॉल्ट आहे. जर तुम्हाला जुनी करप्रणाली निवडायची असेल, तर अंतिम मुदतीच्या आत ITR भरणे बंधनकारक होते. आता विलंबित रिटर्नमध्ये जुनी प्रणाली निवडण्याची संधी बंद झाली आहे.
तोटा पुढे नेण्याचा लाभ नाही : शेअर बाजारातील नुकसान किंवा व्यवसायातील तोटा पुढील वर्षाच्या नफ्यात सेट-ऑफ करण्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
रिफंडला विलंब: जर तुमचा कर परतावा बाकी असेल, तर उशिरा रिटर्न भरल्यास त्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक महिने लागू शकतात.
बिलिटेड रिटर्न भरण्याची सोपी प्रक्रिया
- विलंब झाला असला तरी, आता लगेच बिलिटेड रिटर्न भरा.
- लॉगिन करा: आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
- निवड: 'ई-फाइल' सेक्शनमध्ये जाऊन 'उत्पन्न कर रिटर्न' निवडा.
- मूल्यांकन वर्ष: मूल्यांकन वर्ष (AY) २०२५-२६ निवडा.
- फॉर्म निवडा: तुमच्या उत्पन्नानुसार योग्य फॉर्म (ITR-१ ते ४) निवडा. (उदा. पगारदार व्यक्ती ITR-१ वापरू शकतात.)
- तपासणी: फॉर्म १६, २६AS आणि AIS मध्ये दिलेले सर्व डेटा तपासा.
- सबमिट: डिटेल्स भरून फॉर्म सबमिट करा. विलंब शुल्क आपोआप जोडले जाईल.
वाचा - टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
टीप: आयटीआर भरलेला नसला, तरी तुमच्या Form 16, 26AS आणि AIS मधील डेटा जुळत नसल्यास आयकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, दंड लागू झाला असला तरी, ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ITR नक्की भरा.