Lokmat Money >आयकर > आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली

आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली

ITR With AI : अजूनही प्राप्तीकर परतावा भरायचं म्हटलं की अनेकांच्या जीवावर येतं. पण, आता हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:31 IST2025-08-25T13:08:20+5:302025-08-25T13:31:26+5:30

ITR With AI : अजूनही प्राप्तीकर परतावा भरायचं म्हटलं की अनेकांच्या जीवावर येतं. पण, आता हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे.

File ITR in 3 Minutes TaxBuddy Unveils India's First AI-Powered Tax Platform | आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली

आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली

ITR With AI : भारतात आजही अनेक करदाते चार्टर्ड अकाउंटंट (CA) च्या मदतीने आयकर रिटर्न दाखल करतात. हे काम खूप गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ असल्याचे अनेकांचे मत आहे. करदात्यांच्या याच समस्या दूर करण्यासाठी टॅक्स कंसल्टेशन कंपनी 'टॅक्सबडी'ने देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संचालित टॅक्स फाइलिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. कंपनीचा दावा आहे की, या प्लॅटफॉर्ममुळे ITR दाखल करण्यासाठी फक्त ३ मिनिटांचा वेळ लागेल.

टॅक्सबडी एआय करदात्यांना करेल मदत
टॅक्सबडीच्या म्हणण्यानुसार, हे प्लॅटफॉर्म करदात्यांच्या सर्व शंका दूर करून ITR दाखल करण्यास मदत करेल. करदात्यांना फक्त टॅक्सबडी एआयवर साइन अप करायचे आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतर एआय फक्त ३ मिनिटांत रिटर्न तयार करेल. ही प्रणाली महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट करेल, शंकांचे समाधान करेल आणि संपूर्ण 'कंप्लायन्स' सुनिश्चित करेल. यामुळे स्पष्टीकरणासाठी काही तास किंवा अनेक दिवस वाट पाहावी लागणार नाही.

ITR दाखल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढली
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही, अशा सर्व करदात्यांसाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर, २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ जुलै, २०२५ होती. अधिसूचित ITR मध्ये करण्यात आलेले बदल आणि प्रणाली तयार होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाचा - लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर

या नवीन एआय प्लॅटफॉर्ममुळे आणि वाढलेल्या मुदतीमुळे करदात्यांना ITR दाखल करणे अधिक सोपे आणि सोयीचे होणार आहे.

Web Title: File ITR in 3 Minutes TaxBuddy Unveils India's First AI-Powered Tax Platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.