Lokmat Money >आयकर > Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम

Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम

Myntra Case : ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी मिंत्राने एफडीआय कायद्याचे उल्लंघन करत १६५४ कोटी रुपयांचा परकीय निधी मिळवल्याचा आरोप आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:30 IST2025-07-23T15:07:10+5:302025-07-23T15:30:42+5:30

Myntra Case : ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी मिंत्राने एफडीआय कायद्याचे उल्लंघन करत १६५४ कोटी रुपयांचा परकीय निधी मिळवल्याचा आरोप आहे.

ED Files FEMA Violation Complaint Against Myntra Over ₹1654 Crore Foreign Investment | Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम

Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम

Myntra Case : प्रसिद्ध ऑनलाइन फॅशन रिटेलर मिंत्रा डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड अडचणीत सापडली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या बंगळूरु झोनल ऑफिसने मिंत्रा, त्यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, १९९९ (FEMA) च्या कलम १६(३) अंतर्गत सुमारे १६५४.३५ कोटी रुपयांच्या फेमा उल्लंघनाची तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, मिंत्रा आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांवर असा आरोप आहे की, त्यांनी भारतात लागू असलेल्या परकीय गुंतवणूक (FDI) धोरणांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी 'होलसेल कॅश अँड कॅरी' व्यवसायाच्या नावाखाली प्रत्यक्षात मल्टी-ब्रँड रिटेल ट्रेडिंग (MBRT) व्यवसाय केला आहे.

ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, मिंत्राने केवळ घाऊक व्यवसाय करत असल्याचे कागदोपत्री दाखवले. याच आधारावर, त्यांनी १६५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक भारतात आणले. परंतु, प्रत्यक्षात मिंत्राने त्यांची सर्व उत्पादने व्हेक्टर ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला विकली. त्यानंतर, व्हेक्टर ई-कॉमर्सने ती उत्पादने थेट सामान्य ग्राहकांना किरकोळ विक्रीत विकली.

घोटाळा कसा झाला?
या प्रकरणात घोटाळा कसा घडला हे ईडीने स्पष्ट केले आहे.

  • एकाच गटाच्या कंपन्या : Myntra आणि Vector E-Commerce या दोन्ही कंपन्या प्रत्यक्षात एकाच व्यावसायिक समूहाचा भाग आहेत.
  • बी२बी ते बी२सी चा गैरवापर: मिंत्राने व्हेक्टरला वस्तू विकल्या, हे 'व्यवसाय ते व्यवसाय' (B2B - Business to Business) व्यवहार म्हणून दाखवले गेले. परंतु, त्याच समूहातील व्हेक्टर कंपनीने त्या वस्तू सामान्य ग्राहकांना विकल्या, ज्यामुळे ते 'व्यवसाय ते ग्राहक' (B2C - Business to Consumer) व्यवहारात रूपांतरित झाले.
  • उद्देश: याचा मुख्य उद्देश कायद्यानुसार घाऊक व्यवसाय करत असल्याचे भासवणे हा होता, पण प्रत्यक्षात किरकोळ व्यवसाय करणे हा त्यांचा हेतू होता.

कायद्याचे उल्लंघन कसे झाले?
एफडीआय धोरणानुसार, घाऊक गुंतवणूक करणारी कंपनी तिच्याच समूहातील दुसऱ्या कंपनीला फक्त २५% पर्यंत वस्तू विकू शकते. मात्र, मिंत्राने या नियमाचा थेट भंग करत त्यांच्या समूहातील व्हेक्टर कंपनीला १००% वस्तू विकल्या. हे फेमाच्या कलम 6(3)(b) आणि एफडीआय धोरणांचे (०१.०४.२०१० आणि ०१.१०.२०१०) थेट उल्लंघन आहे.

वाचा - कुठल्याही गुंतवणुकीशिवाय LIC देतंय ७००० रुपये दरमहा! २ लाखांहून अधिक महिलांना फायदा, कसा करायचा अर्ज?

त्यामुळे, ईडीने फेमाच्या कलम १६(३) अंतर्गत 'निर्णय प्राधिकरणासमोर' ही तक्रार दाखल केली आहे. आरोप असा आहे की, मिंत्राने मल्टी-ब्रँड रिटेल व्यवसाय करून नियमांचे उल्लंघन केले, तर घाऊक व्यवसाय करत असल्याचा दावा करून १६५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक मिळवली. आता ईडीने या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू केली असून, पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Web Title: ED Files FEMA Violation Complaint Against Myntra Over ₹1654 Crore Foreign Investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.