Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >आयकर > करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

Advance Tax Deadline : २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या अंतिम हप्त्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. करदाते शक्य तितक्या लवकर तो भरून व्याज आणि दंड टाळू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:31 IST2026-03-06T10:28:57+5:302026-03-06T10:31:42+5:30

Advance Tax Deadline : २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या अंतिम हप्त्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. करदाते शक्य तितक्या लवकर तो भरून व्याज आणि दंड टाळू शकतात.

Advance Tax Deadline Why March 15 is Crucial for Taxpayers in India | करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

Advance Tax Deadline : आर्थिक वर्ष २०२५-२६ आता अंतिम टप्प्यात आहे. करदात्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची डेडलाईन जवळ येत आहे. जर तुमची वार्षिक कर देयता १०,००० रुपयांच्या वर असेल, तर १५ मार्च २०२६ ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत कळीची आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, चालू आर्थिक वर्षासाठी 'ॲडव्हान्स टॅक्स'ची चौथी आणि शेवटची हप्ता भरण्याची ही अंतिम मुदत आहे. या तारखेनंतर दंड आणि व्याजाचा मोठा फटका बसू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

'ॲडव्हान्स टॅक्स' म्हणजे नक्की काय?
सरकारने 'कमाईनुसार पैसे द्या' या तत्त्वावर ही प्रणाली लागू केली आहे. वर्षाच्या शेवटी एकदम मोठी रक्कम भरण्याऐवजी, टप्प्याटप्प्याने कर भरल्यास करदात्यांवरील आर्थिक भार कमी होतो. ज्यांची वार्षिक कर देयता १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या प्रणालीत बसणे बंधनकारक आहे.

कोणाला लागू होतो ॲडव्हान्स टॅक्स?
केवळ मोठे व्यापारीच नव्हे, तर पगारदार व्यक्तींनाही याचा फटका बसू शकतो. जर तुमची पगाराव्यतिरिक्त इतर मार्गांनी (उदा. बँकेचे व्याज, घराचे भाडे, शेअर बाजारातील नफा) कमाई होत असेल आणि त्यावर पुरेसा TDS कापला गेला नसेल, तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरवावा लागेल.

ज्येष्ठ नागरिक: ज्यांना व्यवसायातून उत्पन्न नाही (केवळ पेन्शन किंवा व्याज), त्यांना यातून सूट आहे. मात्र, व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हा कर भरणे बंधनकारक आहे.

हप्त्यांचे वेळापत्रक
करदात्यांवर ताण येऊ नये म्हणून प्राप्तिकर विभागाने चार टप्पे दिले आहेत.

  • १५ जून: एकूण कराच्या किमान १५%.
  • १५ सप्टेंबर: एकूण कराच्या ४५% (मागील हप्त्यासह).
  • १५ डिसेंबर: एकूण कराच्या ७५% (मागील हप्त्यासह).
  • १५ मार्च: एकूण कराच्या १००% रक्कम जमा करणे बंधनकारक.

मुदत हुकली तर काय होईल?

जर तुम्ही १५ मार्चची डेडलाईन चुकवली, तर प्राप्तिकर विभागाच्या कलम २३४B आणि २३४C अंतर्गत तुम्हाला दंडात्मक व्याजाचा सामना करावा लागेल. देय रकमेवर दरमहा १ टक्का या दराने दंड आकारला जातो.

वाचा - युद्धातील एका बातमीने बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची झेप, फक्त 'या' क्षेत्रात घसरण थांबेना

ऑनलाईन भरणा कसा करावा?

  • तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही:
  • प्राप्तिकर विभागाच्या e-filing पोर्टलवर जा.
  • 'e-Pay Tax' पर्यायावर क्लिक करा.
  • 'Challan 100' (Advance Tax) निवडा.
  • नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट पूर्ण करा.
  • पेमेंटची रसीद जतन करा, कारण रिटर्न भरताना त्याची गरज लागेल.
     

Web Title : करदाताओं, 15 मार्च की अंतिम तिथि न भूलें; ब्याज दंड से बचें!

Web Summary : यदि आपकी कर देयता ₹10,000 से अधिक है तो 15 मार्च तक अग्रिम कर का भुगतान करें और दंड से बचें। यह वेतन के अलावा आय वाले वेतनभोगी व्यक्तियों पर लागू होता है। व्यवसाय आय के बिना वरिष्ठ नागरिकों को छूट दी गई है। आयकर पोर्टल पर ऑनलाइन भुगतान उपलब्ध हैं।

Web Title : Don't miss March 15 advance tax deadline; face interest penalties!

Web Summary : Pay advance tax by March 15 if your tax liability exceeds ₹10,000 to avoid penalties. This applies to salaried individuals with income beyond salary. Senior citizens without business income are exempt. Online payment options are available on the income tax portal.