Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा

आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा

ITR News: आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरताना करदात्याने आपण ज्या करदाता श्रेणीत येतो, त्यांच्यासाठी ठरवून देण्यात आलेलाच फार्म निवडणे आवश्यक आहे. चुकीचा फॉर्म निवडल्यास कर परतावा अडकून पडू शकतो.आयटीआर वेळेत भरणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:21 IST2025-06-11T06:19:57+5:302025-06-11T06:21:50+5:30

ITR News: आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरताना करदात्याने आपण ज्या करदाता श्रेणीत येतो, त्यांच्यासाठी ठरवून देण्यात आलेलाच फार्म निवडणे आवश्यक आहे. चुकीचा फॉर्म निवडल्यास कर परतावा अडकून पडू शकतो.आयटीआर वेळेत भरणे आवश्यक आहे.

If the ITR form is wrong, the tax refund will be stuck | आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा

आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा

आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरताना करदात्याने आपण ज्या करदाता श्रेणीत येतो, त्यांच्यासाठी ठरवून देण्यात आलेलाच फार्म निवडणे आवश्यक आहे. चुकीचा फॉर्म निवडल्यास कर परतावा अडकून पडू शकतो.आयटीआर वेळेत भरणे आवश्यक आहे. यंदा आयटीआर दाखल करण्याची मुदत ३१ जुलैवरून वाढवून १५ सप्टेंबर करण्यात आली आहे. आयटीआर भरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती जाणून घेऊया.

उत्पन्नाचे सर्व स्रोत आयटीआरमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. स्रोत लपविल्यास ५० टक्के ते २०० टक्के दंड लागू शकतो. पॅन कार्ड निष्क्रिय होणार नाही याची काळजी घ्या. 
१. विविध श्रेणीतील करदात्यांसाठी आयटीआर-१ पासून आयटीआर-७ पर्यंत विविध फॉर्म ठरवलेले आहेत.
२. मोठे खर्च केले असल्यास त्याचा ताळमेळ करदात्याच्या उत्पन्नाशी बसणे आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.
३. नाव, पत्ता, फोन क्रमांक, पॅन, जन्म तारीख इत्यादी माहिती पॅन कार्डवरील माहितीशी मेळ खाणारी असावी.
५. उत्पन्नाचे सर्व स्रोत आयटीआरमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. स्रोत लपविल्यास ५० टक्के ते २०० टक्के दंड लागू शकतो.
६. नोकरी बदलली असल्यास जुन्या कंपनीकडून मिळालेला फॉर्म १६ नव्या कंपनीला सादर करा. त्यामुळे योग्य टीडीएस कापला जाईल.


 

Web Title: If the ITR form is wrong, the tax refund will be stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.