Hindustan Zinc Share Price: शुक्रवारी शेअर बाजार घसरलेला असतानाही हिंदुस्तान झिंकच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. बीएसईवर या कंपनीचा शेअर ६४२.३० रुपयांच्या स्तरावर उघडला होता. त्यानंतर ३ टक्क्यांच्या वाढीसह तो ६४६ रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला, जो या कंपनीचा नवा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
गेल्या चार व्यवहारांच्या सत्रांपासून हिंदुस्तान झिंकच्या शेअरच्या किमतीत सातत्यानं तेजी दिसत आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या ३० दिवसांत या स्टॉकनं आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना ३५.८७ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
तेजीचं कारण काय?
या शेअरमधील दरवाढीचे मुख्य कारण चांदीच्या किमतीत झालेली वाढ हे आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून आली. सिल्व्हर फ्युचर्सचा दर ८९५१ रुपयांच्या वाढीसह २,३२,७४१ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत चांदी ७५ डॉलर प्रति आउन्सचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरली आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये मार्च सिल्व्हर फ्युचर्सचा दर ८९५१ रुपये म्हणजेच ४ टक्क्यांच्या उसळीनंतर २,३२,७४१ रुपयांवर पोहोचला आहे. १८ डिसेंबरपासून आतापर्यंत यात १४.३३ टक्के म्हणजेच २९,१७६ रुपयांची वाढ झाली आहे.
याशिवाय ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना सातत्यानं लाभांश देत आहे. याच वर्षी जून महिन्यात कंपनी शेवटची एक्स-डिविडेंड म्हणून ट्रेड झाली होती, तेव्हा पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १० रुपये लाभांश मिळाला होता. संपूर्ण २०२४ वर्षाचा विचार केला तर कंपनीने प्रति शेअर एकूण २९ रुपयांचा लाभांश वाटला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
