Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

HDFC Bank: एचडीएफसी बँकेचे सीईओ शशिधर जगदीशन यांच्यावर आर्थिक फसवणुकीसाठी कारवाईची मागणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:20 IST2025-06-08T12:19:22+5:302025-06-08T12:20:28+5:30

HDFC Bank: एचडीएफसी बँकेचे सीईओ शशिधर जगदीशन यांच्यावर आर्थिक फसवणुकीसाठी कारवाईची मागणी केली आहे.

HDFC Bank: Demand to suspend HDFC Bank CEO, accused of Rs 25 crore scam; Know the case | HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

HDFC Bank: लीलावती हॉस्पिटल ट्रस्टने एचडीएफसीबँकेचे सीईओ शशिधर जगदीशन यांच्यावर आर्थिक फसवणुकीसाठी कारवाईची मागणी केली आहे. ट्रस्ट सदस्याच्या वडिलांना त्रास देण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने डायरीमध्ये हस्तलिखित व्यवहार पुरावा म्हणून सादर केले आहेत. पण, एचडीएफसीबँकेच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. काही थकबाकीदार बँकेकडून थकित कर्जाची वसुली टाळण्यासाठी कायद्याचा गैरवापर करत असल्याचे बँकेचे म्हणने आहे.

२५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लीलावती ट्रस्टने बँकेवर २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. जगदीशन आणि इतर ८ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार ते कारवाई करू इच्छितात असे ट्रस्ट सदस्यांनी शनिवारी सांगितले. जगदीशन यांच्यावर दुसऱ्या विद्यमान सदस्याच्या वडिलांना त्रास देण्यासाठी ट्रस्टच्या माजी सदस्याला २.०५ कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. हा व्यवहार हस्तलिखित डायरीत नोंदवण्यात आला होता, जो आता पुरावा म्हणून सादर केला जात आहे.

बँकेचे स्पष्टीकरण 
बँकेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, हा बँकेवरील दीर्घकाळापासून असलेल्या कर्जाच्या वसुलीचा विषय आहे. एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल. 

ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एचडीएफसीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते, जे फेडले जात नव्हते. वसुलीचे प्रयत्न जवळजवळ २० वर्षांपासून सुरू असून, प्रत्येक वेळी प्रशांत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य काही ना काही कायदेशीर युक्ती अवलंबत आहेत. सर्वोच्च न्यायालयासह प्रत्येक स्तरावर अपयशी ठरल्यानंतर, आता बँकेचे एमडी आणि सीईओ यांना लक्ष्य करत आहेत, असा पलटवार बँकेने केला आहे. 

Web Title: HDFC Bank: Demand to suspend HDFC Bank CEO, accused of Rs 25 crore scam; Know the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.