H-1B Visa : भारतीय आयटी कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकेत नोकरी करणे आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. यावर्षी भारतातील टॉप ७ आयटी कंपन्यांना नवीन H-1B व्हिसा अर्जांसाठी केवळ ४,५७३ याचिकांना मंजुरी मिळाली आहे. नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसीच्या रिपोर्टनुसार, ही संख्या २०१५ पासून ७०% आणि गेल्या वर्षापेक्षा ३७% कमी आहे. अमेरिकेत भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी नवीन व्हिसा मिळवणे खूपच आव्हानात्मक झाले आहे.
FPI ची घसरण आणि TCS ची स्थिती
नवीन कर्मचाऱ्यांसाठी टॉप-५ कंपन्यांच्या यादीत आता फक्त टीसीएस ही एकमेव भारतीय कंपनी उरली आहे. जुन्या कर्मचाऱ्यांचा व्हिसा नूतनीकरण करण्याच्या बाबतीतही टीसीएस टॉप-५ मध्ये आहे, पण त्यांचा रिजेक्शन रेट वाढून ७% झाला आहे, जो गेल्या वर्षी ४% होता. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा दर खूप जास्त आहे. टीसीएसला नवीन कर्मचाऱ्यांसाठी फक्त ८४६ H-1B व्हिसा मिळाले, जे मागील वर्षांच्या तुलनेत (२०२४ मध्ये १,४५२) खूपच कमी आहेत.
कमी रिजेक्शनमध्येही वाढता धोका
यावर्षी जुन्या कर्मचाऱ्यांच्या व्हिसा नूतनीकरणाचा रिजेक्शन रेट फक्त १.९% राहिला आहे. यात इन्फोसिस, विप्रो आणि एलटीआयमाईंडट्री सारख्या मोठ्या कंपन्यांचे अर्ज केवळ १ ते २% च फेटाळले गेले. मात्र, नवीन लोकांसाठी अर्ज फेटाळण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये टीसीएसचा रिजेक्शन रेट २%, एचसीएल अमेरिकाचा ६%, एलटीआयमाईंडट्रीचा ५% आणि कॅपजेमिनीचा ४% इतका आहे.
व्हिसा आता नवीन कौशल्ये आणण्यासाठी नाही
लॉ फर्म बीटीजी अडवायाच्या पार्टनर मान्सी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कंपन्या आता नवीन लोकांना अमेरिकेत आणण्याऐवजी, जे आधीच अमेरिकेत कार्यरत आहेत, त्यांना ग्रीन कार्डच्या लांब रांगेत ठेवण्यावर भर देत आहेत. याचा अर्थ, H-1B व्हिसा आता नवीन कौशल्ये आणण्याचा मार्ग न राहता, जुन्या कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवण्याचे साधन बनला आहे.
इमिग्रेशन प्लॅटफॉर्म बियॉन्ड बॉर्डरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' कॅटेगरीमधील अर्जांचे लेबर सर्टिफिकेशन स्टेजवरच मंजुरी मिळणे कमी झाले आहे. याचा अर्थ, व्हिसा देण्यापूर्वीच्या प्राथमिक तपासणीतच भारतीयांचे अर्ज अडकत आहेत.
वाचा - कोविडनंतर बदलली ग्राहकांची निवड! भारतात 'वेल-बीइंग होम्स'चा नवीन ट्रेंड; काय आहे वैशिष्ट्ये?
कंपनीच्या लीगल हेड कामिला फसान्हा म्हणतात की, इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज फेटाळले जाण्याचे कारण हे असू शकते की, अमेरिका H-1B प्रोग्रामबद्दल पूर्वीपेक्षा जास्त कठोर आणि दीर्घ प्रक्रिया वापरत आहे, विशेषतः टेक जॉब्ससाठी. एकूणच, असे दिसत आहे की हे संपूर्ण तंत्र भारतीय आयटी व्यावसायिकांविरुद्ध अधिक कठीण बनले आहे. H-1B व्हिसा हा भारतीय इंजिनिअर्ससाठी अमेरिकेत जाण्याचा सर्वात मोठा दरवाजा आहे.
