Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत

'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत

Vodafone Idea shares: कंपनीचे शेअर्स आज तब्बल ७ टक्क्यांनी वधारले आणि इंट्राडे उच्चांकी ७.०१ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:39 IST2025-06-24T14:39:32+5:302025-06-24T14:39:32+5:30

Vodafone Idea shares: कंपनीचे शेअर्स आज तब्बल ७ टक्क्यांनी वधारले आणि इंट्राडे उच्चांकी ७.०१ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक बातमी आहे.

government will save telecom company vodafone idea from going bankrupt Investors shares jump stock price is rs 7 | 'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत

'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत

Vodafone Idea shares: व्होडाफोन आयडियाचे शेअर्स मंगळवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचे शेअर्स आज तब्बल ७ टक्क्यांनी वधारले आणि इंट्राडे उच्चांकी ७.०१ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक बातमी आहे. वास्तविक, केंद्र सरकार या टेलिकॉम कंपनीला नियामक थकबाकीवर मोठा दिलासा देण्याचा विचार करत असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. व्होडाफोन आयडियाचे शेअर्स गेल्या वर्षभरात जवळपास ६० टक्क्यांनी घसरले असून २०२५ मध्ये आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अधिक माहिती काय?

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीतील कार्यक्रमात दूरसंचार क्षेत्रावर भाष्य केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्राला मक्तेदारी परवडत नाही आणि सरकार सर्व क्षेत्रातील स्पर्धेचं समर्थन करतं, असं ते म्हणाले. या वक्तव्यानंतर कंपनीच्या शेअरबाबतची सकारात्मक भावना आणखी वाढली. केंद्र सरकार व्होडाफोन आयडियाचे सर्वात मोठे इक्विटी मालक आहे. टेलिकॉम ऑपरेटर दिवाळखोरीत जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, ८४,००० कोटी रुपयांच्या थकीत नियामक थकबाकीवर दिलासा देण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे. यापूर्वी व्होडाफोन आयडियानं सरकारला, आपल्या पाठिंब्याशिवाय आर्थिक वर्ष २०२६ नंतर काम करू शकणार नाही आणि दिवाळखोर व्हावं लागू शकतं, असं सांगितलं होतं.

कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 

सरकारची योजना काय?

ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार अनेक पर्यायांवर विचार करत आहे ज्यामुळे कर्जबाजारी कंपनीला दिवाळखोरीपासून वाचवता येईल. यामध्ये परतफेडीचा कालावधी सध्याच्या ६ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत वाढवणं आणि थकित रकमेवर चक्रवाढ व्याजाऐवजी साधं व्याज आकारणं यांचा समावेश आहे. एजीआरच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत थकित रकमेच्या अंशत: देयकासाठी वार्षिक १,००० ते १,५०० कोटी रुपयांची टोकन रक्कम घेणं हा आणखी एक पर्याय आहे, असं या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी ईटीला सांगितलं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दिलासा अनेक पर्यायांपैकी एक असू शकतो किंवा अनेक पर्याय एकत्र मिळूनही असू शकतो. कंपनीनं या वर्षाच्या सुरुवातीला घोषणा केली होती की केंद्र सरकार आपल्या थकित स्पेक्ट्रम थकबाकीचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करेल. इक्विटी शेअर्सचे रूपांतर झाल्यानंतर व्होडाफोन आयडियामधील भारत सरकारचा हिस्सा २२.६ टक्क्यांवरून ४८.९९ टक्क्यांवर पोहोचलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आले आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: government will save telecom company vodafone idea from going bankrupt Investors shares jump stock price is rs 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.