Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले

Gold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:38+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे.

Gold Rates: Thousand fall in gold prices; In two days, it fell by Rs 1,600 | Gold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले

Gold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे मंगळवारपाठोपाठ बुधवारीही एकाच दिवसात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. यात ६२ हजार रुपयांवरून ६१ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोने ५१ हजार ३०० रुपयांवरून ५० हजार ३०० रुपये प्रति-तोळ्यावर आले. पितृपक्षात भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात मात्र अधिकमासात घसरण होत असल्याचे उलट चित्र निर्माण झाले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. त्यामुळेच एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा मात्र वाढले. परिणामी आठवडाभरात चांदीचे भाव वाढून ते ६८ हजार रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ५२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. मात्र आता अधिक-मासात या दोन्ही धातूंचे भाव कमी-कमी होत आहे.

Web Title: Gold Rates: Thousand fall in gold prices; In two days, it fell by Rs 1,600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.