gold rate update gold rate fell rs 121 to rs 50630 per 10 grams silver 1277 rupees | Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर    

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर    

ठळक मुद्देचांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी १२७७ रुपये प्रति किलो स्वस्त झाली.

नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅम सोने  १२१ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. याचवेळी चांदीच्या किंमती प्रति किलो १२७७ रुपयांनी घसरले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विदेशी बाजारात सोन्याची किंमत एक महिन्याच्या खालच्या स्तरावर आली आहे. 

फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. यामुळेच बुधवारी डॉलर एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. या कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू आहे. पुढील आठवड्यातही किंमतींवर दबाव येण्याची शक्यता आहे.

सोन्याचे नवीन दर 
गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १२१ रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ ग्रॅम शुद्ध सोन्याचा नवीन दर आता ५०,६३० रुपये  प्रति १० ग्रॅम आहे.  पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव ५०,७५१ रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत १८७८ डॉलर प्रति औंस झाली आहे. सोन्याचे दर २ टक्क्यांनी घसरले. 

चांदीचे नवीन दर
चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी १२७७ रुपये प्रति किलो स्वस्त झाली. चांदीची किंमत प्रति किलो ६०,०९८ रुपये झाली आहे. ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच बुधवारी चांदीचे दर ६०,०९८ रुपये प्रतिकिलोवर बंद झाले होते.

दिवाळीला कमाईची संधी; जाणून घ्या, कशी आणि कुठे? - 
ज्या लोकांनी सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB - Sovereign Gold Bonds) मध्ये सर्वात आधी गुंतवणूक केली होती. त्यांना पुढील महिन्यात सोन्यापेक्षा दुप्पट कमविण्याची संधी आहे. दरम्यान, नोव्हेंबर १०१५ मध्ये लॉन्च झालेल्या सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्सच्या प्रीमॅच्योर रिडेम्पशनचा कालावधी नोव्हेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यावेळी गोल्ड बॉन्डची किंमत प्रति ग्रॅम २,६८३ रुपये होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA - Indian Bullion & Jewellers Association) मते, सोन्याची किंमत सध्या प्रति ग्रॅम ५,१३५ रुपये आहे. पहिल्या गोल्ड बॉन्डची ५ वर्षे पूर्ण होतील, अशात फिजिकल फॉर्म किंवा ऑनलाइन गोल्ड बॉन्ड खरेदी करणारे गुंतवणूकदार त्याची पूर्तता करू शकतात.

कसा ठरतो सोन्याचा भाव?
डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.


आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gold rate update gold rate fell rs 121 to rs 50630 per 10 grams silver 1277 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.