Gold rate: Gold price reaches 10-month low | Gold rate: सोन्याच्या दराने गाठला १० महिन्यांतील नीचांक

Gold rate: सोन्याच्या दराने गाठला १० महिन्यांतील नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच असून, गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस मोठी घसरण पाहायला मिळाली. या दोन दिवसांत चांदी तब्बल तीन हजार ५०० रुपयांनी घसरून ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्यातही एक हजार २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४५ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या १० महिन्यांतील सोन्याचे हे नीचांकी दर असून, ७ मे, २०२० रोजी सोन्याने ४५ हजारांचा पल्ला ओलांडून ते ४६ हजारांवर पोहोचले होते.


गेल्या १० दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता, सोन्या-चांदीत सातत्याने घसरण सुरू आहे. दररोज घसरण होत असल्याने सोने मे महिन्यानंतर प्रथमच ४६ हजारांच्या खाली आले आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gold rate: Gold price reaches 10-month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.