Gold price do not be in hurry for buying gold wait some times price may be reaches to 45 thousand rupees | सोनं खरेदी करताय? जरा थांबा!; एवढा खाली येऊ शकतो दर, असा आहे तज्ज्ञांचा अंदाज

सोनं खरेदी करताय? जरा थांबा!; एवढा खाली येऊ शकतो दर, असा आहे तज्ज्ञांचा अंदाज

नवी दिल्ली - जागतीक पातळीवर होणाऱ्या परिणामांमुळे, देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात वेगाने घसरण होत आहे. खरे, तर कोरोना व्हायरसवरील लशीत येणारे यश आणि आर्थिक कामकाजातील वेगामुळे गुंतवणूक दारांचा सोन्यातील गुंवणुकीचा कल कमी झाला आहे. यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहेत. 

इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशनचे अध्यक्ष (मुंबई) कुमार जैन यांच्या मते, सोन्याच्या किमतीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 8000 रुपयांची घसरण झाली आहे. तर, कोरोना लशीसंदर्भातील आशावादामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात, सोन्याचे दर 45,000 रुपये प्रती 10 ग्रॅमच्या जवळपास येऊ शकतात,

कमी होतोय आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा सोन्यातील गुंतवणुकीकडील कल -  
तज्ज्ञांनी म्हटले आहे, की सोन्यातील घसरणीचा काळ आता सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही आता यातून पैसे काढू लागले आहेत. सोन्याची पुढची लेवल 47 हजार रुपये प्रती दहा ग्रॅम आहे. मात्र, सातत्याने होत असलेली घसरण पाहता, सोन्याचा दर 45 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत आला तर आश्चर्य नाही. काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यात आणखीही घट होऊ शकते. त्यांच्यामते सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आणखी एक ते दोन महिना थांबायला हवे. एकदा का कोरोना लस बाजारात आली, की सोन्याच्या दरात आणखी वेगाने घसरण व्हायला सुरुवात होईल.

सोन्यात गुंतवणूक म्हणजे फायद्याचा सौदा - 
अनेक वेळा सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. कुठल्याही गुंतवणूकदाराला पाच ते दहा टक्के गुंतवणूक सोन्यात करायलाच हवी. कारण सोन्याची लिक्विडिटी फार अधिक असते. यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्यातील गुंतवणुकीकडे अधिक असतो. 

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या मते, सध्या भारतात ज्वैलरीची मागणी घटली आहे. मात्र येणाऱ्या पुढच्या काळात यात तेजीही येऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोने नक्की खरेदी करा, पण थोडे थांबून.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gold price do not be in hurry for buying gold wait some times price may be reaches to 45 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.