Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?

भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 8 May: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:58 IST2025-05-08T15:57:18+5:302025-05-08T15:58:36+5:30

Gold Silver Price 8 May: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Gold and silver prices 8th may 2025 hit amid India Pakistan tensions attack on lahore big fall in price what are the new rates | भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?

भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 8 May: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,०२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदी ११७४ रुपयांनी घसरून ९४,६०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकते. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात. 

आयबीजेएच्या दरानुसार, आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १३९६ रुपयांनी घसरून ९६,३७४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १२८४ रुपयांनी घसरून ८७,९५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १० कॅरेट सोन्याचा भाव ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ८२० रुपयांनी कमी होऊन ५६,१७४ रुपये झाला आहे.

यंदा सोनं २०,३८४ रुपयांनी वधारलं

२२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. यंदा सोनं सुमारे २०,३८४ रुपयांनी तर चांदी ८९२० रुपयांनी महागली आहे.

Web Title: Gold and silver prices 8th may 2025 hit amid India Pakistan tensions attack on lahore big fall in price what are the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.