Glen Industries IPO: इको फ्रेंडली फूड पॅकेजिंग आणि सर्व्हिस प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या ग्लेन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या आयपीओचा आज अखेरचा दिवस आहे. या गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पब्लिक ऑफर ८ जुलै रोजी उघडली गेली आणि १० जुलै रोजी म्हणजेच आज बंद होईल. यासाठी कंपनीनं ९२-९७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आज सकाळपर्यंत आयपीओसाठी ४३.२० पट बोली लावण्यात आली होती.
बीएसई एसएमईवर लाँच करण्यात आलेला आयपीओ सकाळी १८.८८ कोटी शेअर्ससाठी सब्सक्राइब करण्यात आली, तर कंपनीने ४३.७१ लाख शेअर्सची ऑफर दिली आहे. चित्तौडगढ वेबसाइटनुसार, किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत ग्लेन इंडस्ट्रीजच्या आयपीओला ५४.४९ पट, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) श्रेणीमध्ये आयपीओ ७९.१९ पट सब्सक्राइब झाला. त्याचबरोबर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) सेगमेंटमध्ये १.६९ पट सबस्क्रिप्शन मिळालं.
ग्लेन इंडस्ट्रीज जीएमपी
प्राथमिक बाजारात ग्लेन इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वादळी तेजी पाहायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास तो ३५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. अशा परिस्थितीत याची अंदाजित लिस्टिंग १३२ रुपयांच्या किंमतीत असू शकते. ही पातळी ९७ रुपयांच्या वरच्या किमतीपेक्षा ३६ टक्क्यांनी अधिक आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार
या सार्वजनिक आयपीओच्या माध्यमातून कंपनी ६३.०२ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे, ज्यासाठी ६४.९७ लाख शेअर्स जारी केले जातील. हा आयपीओ ऑफर फॉर सेल (ओएफएस) वगळून पूर्णपणे नवीन इक्विटी जारी करेल. त्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान दोन लॉट किंवा २४०० शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. दोन लॉटची किंमत २,२०,८०० रुपये आहे. तर हाय नेटवर्थ व्यक्तींना (एचएनआय) किमान ३ लॉट किंवा ३,६०० शेअर्ससाठी बोली लावावी लागणार आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)