Lokmat Money > बिझनेस न्यूज > SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक

SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक

सध्या सायबर फ्रॉड्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता सेबीच्याही नावानं फसवणूक होत असल्याचं समोर आलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:34 IST2025-06-05T11:33:25+5:302025-06-05T11:34:42+5:30

सध्या सायबर फ्रॉड्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता सेबीच्याही नावानं फसवणूक होत असल्याचं समोर आलंय.

Fraud is going on in the name of SEBI if you have also received a notice you can check like this | SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक

SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक

सध्या सायबर फ्रॉड्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता सेबीच्याही नावानं फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. सेबीच्या नावानं बनावट कागदपत्रं आणि नोटिसा पाठवून काही घोटाळेबाज लोकांची दिशाभूल करत आहेत, असं बाजार नियामक सेबीनं म्हटलंय. सेबीचा लोगो, लेटरहेड आणि सीलचा गैरवापर करून ही फसवणूक केली जात आहे. एवढंच नव्हे तर पाठवणारा पीएसीएलच्या मालमत्तेचा खरेदीदार असल्याचं दाखवून बनावट विक्री प्रमाणपत्रही जारी करण्यात आल्याचं दिसून आलंय. बनावट दाखले देऊन थर्ड पार्टी व्हेंडर खात्यांच्या वापराला सेबीनं मान्यता दिली असल्याचा दावाही केला जात आहे.

अशा सर्व फसवणुकीबाबत सेबीनं सर्वसामान्यांना इशारा दिलाय. सेबीनं म्हटलंय की, जर त्यांच्या नावानं दंड भरण्याची किंवा मालमत्तेची माहिती मागणारा कोणताही मेल, कॉल किंवा नोटीस प्राप्त झाली तर प्रथम ती आपल्या अधिकृत वेबसाइटवरून तपासा. सेबीच्या म्हणण्यानुसार, आजकाल काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या नोटिसा येत आहेत, ज्यामध्ये त्यांना सेबीच्या वतीनं दंड भरण्याची धमकी दिली जात आहे.

'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली

कसं वाचू शकता

कोणत्याही संशयास्पद ई-मेल, नोटीस किंवा मेसेज खरा आहे की नाही हे सेबीच्या वेबसाईटवर जाऊन पडताळून पाहण्याचं आवाहन सेबीनं केलंय. सेबीची ऑर्डर तपासण्यासाठी Enforcement>Orders वर जा. त्याचप्रमाणे Recovery Certificate तपासण्यासाठी अंEnforcement>Recovery Proceedings ची मदत घ्या. सेबीचे दस्तऐवज योग्य आहेत की नाही याची माहिती Authenticate Document Number वरुन तपासू शकता.

सेबी अधिकाऱ्यांच्या संपर्क सूचसाठी सेबी डिरेक्टरी तपासू शकता. सेबीच्या म्हणण्यांनुसार कोणताही ईमेल @sebi.gov.in वरुन आला असेल तर त्यावर भरवसा करू नका. कोणत्याही प्रकारची वैयक्तिक मागणी करणाऱ्या मेसेजवर भरवसा करू नका, असंही सेबीनं म्हटलंय.

Web Title: Fraud is going on in the name of SEBI if you have also received a notice you can check like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.